भांडूप येथील एका शाळेत शिक्षिकेची नोकरी. वार्षिक उत्पन्न १३ लाख रुपये. पतीही नोकरदार. मध्यमवर्गीय कुटुंब असल्याचा दावा करणारी स्त्री अनेक कंपन्यांची भागिदार कशी, असा प्रश्न संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याबाबत विचारला जात आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भांडूप येथील एका शाळेत शिक्षिकेची नोकरी. वार्षिक उत्पन्न १३ लाख रुपये. पतीही नोकरदार. तरीही अनेक कंपन्यांच्या भागिदार कशा असा प्रश्न संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याबाबत विचारला जात आहे. Varsha Sanjay Raut news
वर्षा संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस पाठविली आहे. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी चौकशी होणार आहे.
वर्षा राऊत या मुंबईतील भांडूप येथील एका शाळेत शिक्षिका आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न तेरा लाख रुपये आहे. तरीही त्या चित्रपट निर्मात्या आहेत. याशिवाय रायटर एंटरटेंमेंट, सनातन मोटर्स प्रा. लि., सिध्दांत सिस्कॉन प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांच्या भागिदार आहेत. 2016 मध्ये संजय राऊत यांनी राज्यसभेची निवडणूक लढविली होती. यावेळी निवडणूक आयोगाकडे आपल्या संपत्तीच्या विवरणासह प्रतिज्ञापत्र सादर केली होती.
त्यानुसार संजय राऊत आणि वर्षा राऊत या दाम्पत्याकडे जवळपास 15 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता होती. प्रतिज्ञापत्रानुसार, संजय राऊत यांच्या हातात 19 हजार 271 रुपयांची रोकड होती. तर पत्नीकडे 38 हजार 288 रुपये हातात होते. मुलगी पूर्वशीकडे 25 हजार तर लहान मुलगी विधीताच्या हातातील रक्कम 500 रुपये दाखवण्यात आले होते. संजय राऊतांनी त्यावेळी वेगवेगळ्या बँकांमधील डिपॉझिट, मुदत ठेवी, नॉन बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूक दाखवली होती. पत्नीच्या नावे बँकेत जवळपास 5 खात्यांची नोंद होती.
पालघर, अलिबागमध्ये राऊत यांच्या पत्नीच्या नावे जमिनी असल्याची नोंद आहे. वर्षा राऊत यांच्याकडे जवळपास 23 लाख रुपयांचे दागिने होते. पैसे, शेअर्स, दागिने मिळून ५१ लाख २३ हजार ६२१ रुपयांची मालमत्ता होती. मुलगी पूर्वशी राऊत हिच्याकडे ३ लाख ३९ हजार ५१० तर विधीता राऊत हिच्याकडे ३९ हजार ९१२ रुपयांची संपत्ती होती. संजय राऊत यांच्याकडे ४ कोटी ८१ लाख ४८ हजार तर वर्षा राऊत यांच्याकडे ७ कोटी १० लाख ८९ हजार रुपयांची एकूण संपत्ती होती.
संजय राऊत परिवार, प्रवीण राऊत परिवाराकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. मग हा पैसा कुठून आला? कॅश ट्रेल, मनी ट्रेल पीएमसी बँकेचा एचडीआयएलच्या मागार्ने पैसा कुठून कुठं गेला? याचा तपास तर व्हायलाच हवा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. एचडीआयएल आणि ग्रुप कंपन्यांकडून त्यांना किती रक्कम मिळाली? एचडीआयएलने पीएमसी बँकेचे ५ हजार ४०० कोटी चोरले आहे. एचडीआयएलने पीएमसी बँकेचे ५ हजार ४०० कोटी चोरले आहे. एचडीआयएल आणि प्रवीण राऊत परिवाराचे कोट्यावधी रुपयांचे आर्थिक संबंध आहेत, व्यवहार आहेत.
प्रवीण राऊत परिवार आणि संजय राऊत परिवाराचे पण आर्थिक व्यवहार व विशेष संबंध आहेत. संजय राऊत परिवार, प्रवीण राऊत परिवाराकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. मग हा पैसा कुठून आला? कॅश ट्रेल, मनी ट्रेल पीएमसी बँकेचा एचडीआयएलच्या मार्गाने पैसा कुठून कुठं गेला? याचा तपास तर व्हायलाच हवा, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App