कोरोनाच्या काळात सर्वत्र काळाबाजार करून पैसे कमाविण्यासाठी मढ्याच्या टाळूवरचे लोणी खायलाही कमी केले जात नसताना उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील एक कंपनीने मानवतेच्या सेवेचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. रिमझिम इस्पात लिमिटेड या कंपनीने केवळ एक रुपया दराने ऑक्सिजनचे एक हजार सिलेंडर विविध जिल्ह्यांना पुरविले. Unique service to humanity, oxygen provided at the rate of only one rupee per cylinder
विशेष प्रतिनिधी
हमीरपूर : कोरोनाच्या काळात सर्वत्र काळाबाजार करून पैसे कमाविण्यासाठी मढ्याच्या टाळूवरचे लोणी खायलाही कमी केले जात नसताना उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील एक कंपनीने मानवतेच्या सेवेचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. रिमझिम इस्पात लिमिटेड या कंपनीने केवळ एक रुपया दराने ऑक्सिजनचे एक हजार सिलेंडर विविध जिल्ह्यांना पुरविले.
रिमझिम इस्पात ही कंपनी वास्तविक औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन निर्मिती करते. परंतु, कोरोनाच्या काळात रुग्णांना ऑक्सिजनची गरज पाहून त्यांनी वैद्यकीय उपयोगाचा ऑक्सिजन तयार करण्यास सुरूवात केली. जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर त्रिपाठी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन या कंपनीने कोरोना रुग्णांसाठी एक रुपया दराने सिलेंडर पुरविण्याचा निर्णय घेतला. बुंदेलखंडातील अनेक रुग्णांसाठी ही कंपनी देवदूत बनून आली आहे.
झॉँशी, बांदा, महोबा, चित्रकूट, ललितपुर, जालौन, कानपुर, फतेहपुर जिल्ह्यात हे सिलेंडर पुरविण्यात आले. कंपनीचे व्यवस्थापक मनोज गुप्ता यांनी सांगितले की विविध जिल्ह्यातून चाळीस गाड्या रिकामे ऑक्सिजन घेऊन कंपनीत आल्या होत्या. या सर्वांना ऑक्सिजन पुरविण्यात आला. कंपनीचे संचालक योगेश आगरवाल यांनी सांगितले की, कंपनीकडून ऑक्सिजन चा पुरवठा यापुढेही सुरूच राहणार आहे.
याच कंपनीला दहा वर्षांपूर्वी प्रशासनाने बंद करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा प्रशासनाने त्याला सिलही ठोकले होते. परंतु, आज कोरोनाच्या महामारीत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यावर हिच कंपनी देवदूत बनून काम करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App