मणिशंकर – ठाकरे : चहाची किंमत 206 वरून 44 वर; रिक्षेचा मीटर 56 वरून किती??


“मणिशंकर – ठाकरे : चहाची किंमत 206 वरून 44 वर, तर रिक्षाचा मीटर 56 वरून किती??”, हे शीर्षक वाचल्यावर जरा विचित्र वाटेल. पण ही वस्तुस्थिती आहे.Uddhav Thackeray will have to pay the political price for his rikshwawala statement like manishankar aiyer’s statement of chaiwala

2009 च्या निवडणुकीत लोकसभेच्या 206 जागा मिळवणारी काँग्रेस एका चहाची किंमत चुकवून 44 वर आली, तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 56 जागा मिळवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुढच्या निवडणुकीत “रिक्षाचा मीटर” वाढवून कोणती आणि किती किंमत चुकवावी लागणार आहे??, हा खरा प्रश्न आहे!!

सावरकरांच्या काव्यपंक्ती हटवल्या; बाळासाहेबांचे जोडे खाल्ले

अंदमानातील स्वातंत्र्यज्योती वरील सावरकरांच्या काव्यपंक्ती काढून टाकण्याची मस्ती दाखवणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला बाळासाहेब ठाकरे यांनी जोडे मारले होते. पण ते जोडे खाऊनही मणिशंकर अय्यर यांची हिंदुत्व विरोधाची मस्ती उतरली नव्हती. 2014 च्या निवडणुकीत ती जास्तच उफाळून आली आणि ते नरेंद्र मोदींना चहावाला म्हणून मोकळे झाले. पण या चायवाल्याने बनवलेल्या गरमागरम वाफाळलेल्या चहाने काँग्रेसचे तोंड एवढे भाजले की ते 206 जागांवरून एकदम 44 जागांवर आले!!काँग्रेसच्या महाअधिवेशनाच्या ठिकाणी मोदींना चहाचा स्टॉल लावण्याची हिणकस ऑफर देणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या मुक्ताफळांची काँग्रेसला जबर राजकीय किंमत चुकवावी लागली. 2014 मध्ये चुकवलेल्या किमतीचे व्याज 2022 निम्मे उलटून गेले तरी अजून फिटत नाहीये.

धडा शिकलेच नाहीत

आता काँग्रेसच्या झालेल्या या अवस्थेतून खरे म्हणजे अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी धडा शिकायला हवा होता. पण तो शिकला नसल्याचे उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. म्हणूनच ते मणिशंकर अय्यर यांची आधी बाळासाहेबांनी आणि नंतर मोदींनी केलेली केलेली गत विसरून उलट त्यांच्याच पावलावर पाऊल टाकते झाले आहेत!! त्यांनी शिवसेना भवनात महिला मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना “रिक्षावाला” असे हिणकस पद्धतीने संबोधले आहे. रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट सुटली होती. तिचा ब्रेक लागतच नव्हता, असे वक्तव्य करून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांची उडवली होती आता त्याची किंमत किती चुकवावी लागेल??, हा सवाल तयार झाला आहे.

 कष्टकरी एकनाथाचे गुण बाळासाहेबांनी ओळखले

ज्या कष्टकरी एकनाथ शिंदे यांचा रिक्षावाल्याचा गुण ओळखून आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना शिवसेना नावाच्या पक्षाचे नेतृत्व करण्याइतपत मोठे केले, त्यांनाच उद्धव ठाकरे यांनी “रिक्षावाला” असे हिणकस पद्धतीने संबोधले. स्वतः एकनाथ शिंदे आपण रिक्षावाला असल्याचे कधीच लपवत नव्हते. उलट मी कष्ट करून पोट भरले. बाळासाहेबांनी मला मोठे केले. आनंद दिघेंनी मला आशीर्वाद दिले हे ते उघड म्हणतात. तरी देखील रिक्षावाला म्हणून हिणवण्याने उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतल्या धनुष्यबाणातला असा कोणता तीर मारला हे कळायला मार्ग नाही!! उलट हा तीर उलटा शिवसेनेत घुसल्यास नवल वाटायला नको!!

महापालिका निवडणुकीत पहिली संधी

मणिशंकर अय्यर यांच्या मोदींवरच्या चहावाला विधानामुळे काँग्रेसला जी राजकीय किंमत चुकवावी लागली, तशीच राजकीय किंमत शिवसेनेला आणि विशेषतः उद्धव ठाकरेंना त्यांच्याच एकनाथ शिंदे यांच्या वरच्या वक्तव्याने चुकवावी लागण्याची शक्यता आहे!! प्रश्न फक्त निवडणुका जवळ येण्याचा आहे आणि मुंबईसह 14 महापालिकांच्या निवडणुका जवळच आहेत. नंतर विधानसभा निवडणुकीत अब तक 56 वरून बाद में “रिक्षाचा मीटर” किती फिरतो??, हे पाहणे जास्त रंजक ठरणार आहे.

Uddhav Thackeray will have to pay the political price for his rikshwawala statement like manishankar aiyer’s statement of chaiwala

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था