U-19 Asia Cup : हुर्रे …विजयाची हॅटट्रिक…श्रीलंकेचा धुव्वा ; भारतीय संघाने जिंकला आशिया चषक


दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या अंडर-19 संघाने श्रीलंकेचा पराभव केला, फिरकीपटू विकी ओस्तवालने केला चमत्कार .U-19 Asia Cup:Congratulations!… Indian team wins Asia Cup


विशेष प्रतिनिधी

दुबई: दुबईत अंडर-19 आशिया कपमध्ये भारताने विजयाचा तिरंगा फडकावला आहे. यश ढूलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंडर-19 आशिया कप जिंकला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव केला. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 38 षटकांत केवळ 106 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने केवळ एक गडी गमावून लक्ष्य गाठले. डकवर्थ-लुईस नियमानुसार, भारतीय संघाला 38 षटकांत 102 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी एंगक्रिश रघुवंशी आणि शेख रशीद यांच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर पूर्ण केले.U-19 Asia Cup:Congratulations!… Indian team wins Asia Cup

 

दुबईत पार पडलेल्या १९ वर्षाखालील आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने बाजी मारली आहे. यश ढूलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेला ९ विकेटने धुव्वा उडवत विजेतेपदावर मोहर उमटवली आहे.

श्रीलंकेच्या संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. परंतू भारतीय गोलंदाजांनी पहिल्यापासूनच भेदक मारा करत सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखलं. विकी ओसत्वाल, कौशल तांबे आणि अन्य गोलंदाजांसमोर श्रीलंकेच्या संघाने अक्षरशः नांगी टाकली. एकामागोमाग एक विकेट जाण्याचं सत्र सुरुच राहिल्यामुळे श्रीलंकेचा संघ मोठी भागीदारी करु शकला नाही.

एका क्षणाला श्रीलंकेच्या संघाची अवस्था ८ बाद ८२ अशी झाली होती. अशावेळी लंकेचा संघ शतकी धावसंख्येचा टप्पातरी ओलांडतो की नाही असं वाटत होतं. परंतू रवीन डी-सिल्वा, यसिरु रोड्रिगो, मथीशा पाथीरना यांनी भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत संघाला शतकी धावसंख्या ओलांडून दिली. ज्यामुळे निर्धारित षटकांमध्ये श्रीलंकेचा संघ ९ विकेट गमावत १०६ धावांपर्यंत मजल मारु शकला.

DLS मेथडप्रमाणे भारतीय संघाला ३२ ओव्हरमध्ये १०२ धावांचं सुधारित आव्हान देण्यात आलं. ज्याचा भारतीय संघाने यशस्वी पाठलाग केला. सलामीवीर हरनुर सिंग झटपट माघारी परतल्यामुळे भारतीय संघाची खराब सुरुवात झाली होती. परंतू यानंतर अंगरिक्ष रघुवंशी आणि शाईक रशिद यांनी लंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताकडून रघुवंशीने नाबाद ५६ तर रशिदने ३१ धावांची खेळी केली.

भारत 8व्यांदा चॅम्पियन…

अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचे वर्चस्व कायम आहे. टीम इंडियाने 8व्यांदा आशिया कप जिंकला.
भारताने पहिल्यांदा ही स्पर्धा १९८९ मध्ये जिंकली होती. यानंतर 2003 मध्ये तो पुन्हा चॅम्पियन बनला. 2012 मध्ये ट्रॉफी पाकिस्तानसोबत शेअर केली होती. यानंतर 2013, 2016 मध्येही भारताने ही स्पर्धा जिंकली होती. अफगाणिस्तान 2017 मध्ये आशियाचा हिरो बनला. टीम इंडियाने 2018, 2019 आणि आता 2021 मध्ये आशिया कप चॅम्पियन बनून विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे.

 

U-19 Asia Cup:Congratulations!… Indian team wins Asia Cup

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात