कोरोना साथीच्या दुसर्या लहरीशी झुंज देत भारताला मदत करण्यासाठी अनेक देश आणि नामांकित व्यक्ती पुढे आली आहेत.Twitter CEO Jack Dorsey donates $15 million for India’s Covid relief efforts
वृत्तसंस्था
नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसर्या लाटेशी झगडणाऱ्या भारताला मदत करण्यासाठी गुगल आणि मायक्रोसॉफ्टनंतर आता मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने पुढाकार घेतला आहे. भारताला ट्विटरने १.५ कोटी डॉलर म्हणजेच सुमारे ११० कोटी रुपयांची मदत केली आहे. ही मदत तीन स्वयंसेवी संस्थांमार्फत केली जाणार आहे. त्यापैकी शिकागोस्थित सेवा इंटरनॅशनल ही संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे. या संस्थेला पंचवीस लाख डॉलरची (सुमारे १९ ते २० कोटी रुपये) देणगी दिली आहे. Twitter CEO Jack Dorsey donates $15 million for India’s Covid relief efforts
ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक पॅट्रिक डोर्सी यांनी ट्विट करुन ही रक्कम भारतात कशी पोहोचेल याबाबद्दल माहिती दिली आहे. जॅक डोर्सी यांच्या म्हणण्यानुसार, ही रक्कम केअर, एड इंडिया आणि सेवा इंटरनॅशनल यूएस या तीन स्वयंसेवी संस्थांना देण्यात आली आहे. त्यापैकी केअरला १ कोटी डॉलर, एड इंडिया आणि सेवा इंटरनॅशनलला प्रत्येकी २५ लाख डॉलर्स देण्यात आले आहेत.
$15 million split between @CARE, @AIDINDIA, and @sewausa to help address the COVID-19 crisis in India. All tracked here: https://t.co/Db2YJiwcqc 🇮🇳 — jack (@jack) May 10, 2021
$15 million split between @CARE, @AIDINDIA, and @sewausa to help address the COVID-19 crisis in India. All tracked here: https://t.co/Db2YJiwcqc 🇮🇳
— jack (@jack) May 10, 2021
ट्विटरद्वारे प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, शिकागोस्थित सेवा इंटरनॅशनल ही हिंदू श्रद्धेवर आधारित सेवा संस्था आहे. ही संस्था प्राणवायूचे प्रमाणक, मशीनसारखी व्हेंटिलेटर जीवनरक्षक उपकरणे पुरवेल. सर्व उपकरणे देशातील सरकारी रुग्णालये आणि कोविड -19 केअर सेंटरमध्ये वितरित केली जातील. त्याचबरोबर नवीन कोविड -19 केअर सेंटर बांधले जातील, केअरकडून प्राप्त झालेल्या निधीतून ऑक्सिजन, पीपीई किट्स आणि इतर आवश्यक वस्तू प्रदान केल्या जातील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App