विशेष प्रतिनिधी
हिंगोली : मागील १५ दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने हिंगोली जिल्ह्यांमध्ये पुन्हा सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. Torrential rain in Hingoli; The crisis of double sowing was averted
हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यामध्ये बुधवारी रात्री सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पिकांना देखील जीवनदान मिळाले आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात होती व दुबार पेरणीचे संकट ओढावते की काय या चिंतेमध्ये शेतकरी पडले होते.
परंतु हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून बुधवारी रात्री हिंगोली जिल्ह्यांमध्ये सर्वदूर पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यावरील दुबार पेरणीचे संकट टळले असून पिकांना देखील आता जीवदान मिळाल्याने शेतकरी वर्गातून आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App