ही आहेत भारतातील बारा स्थापत्यशास्त्राची उत्तम उदाहरणे.. तुम्ही पाहिलीत?


स्थापत्यशास्त्रातील भारताची परंपरा खूप जुनी आहे. आणि स्वातंत्र्यानंतरही या क्षेत्रामध्ये खूप मोठे कार्य घडलेले आहे. खाली उल्लेख केलेली सर्वोत्तम अभियांत्रिकी वास्तूंची उदाहरणे आहेत. भारत हा नेहमीच सांस्कृतिक वैविध्य आणि स्थापत्यशास्त्रामधील अवाढव्य अश्या वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे. या ऐतिहासिक वास्तू पर्यटकांनाही भारतात आकर्षित करत असतात. आता या वास्तूंची आपण माहिती घेऊ.

Top 12 engineering Marvels in India

१. अटल टनल- रोहतांग पास : रोहतांग पास येथील अटल टनल हे १००४० फूट उंचीवर बनवले आहे. याला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव दिले आहे. याचे सुरुवातीचे बजेट १४०० कोटी रुपये होते. याचा एकूण खर्च ३२०० कोटी झाला आहे. मनाली आणि लोहोल स्पिती मधील अंतर यामुळे ४६ किलोमीटर ने कमी झाले.

२. पंबन ब्रीज – तामिळनाडू : हा ब्रिज देशातील पहिला समुद्री पुल आहे. 24 फेब्रुवारी 1914 मधे त्याचे बांधकाम सुरू झाले होते. हा ब्रिज रामेश्वर आणि तामिळनाडू यांना जोडतो. समुद्रातून जाणाऱ्या रेल्वेचे दृश्य खूप सुंदर दिसते.

३. बांद्रा वरळी सीलिंग : हा भारतातील ८ पदरी असलेला पुल सध्या पूर्णपणे वापरला जात आहे. यासाठी १६ अब्ज रुपये खर्च झाले. १९८० मधे सुरू झालेला हा प्रकल्प २००९ मधे खुला झाला. बांद्रा व वरळी मधील अंतर ४५ मिनिटांवरून ६ मिनिट वर आले आहे.

४. स्टॅच्यू ऑफ युनिटी : जगातील सर्वात उंच असा हा पुतळा सात किलोमीटर क्षेत्रामध्ये आहे. तेथे म्युझियम, तसेच राहणे व जेवण्याची सोय तसेच बाग देखील आहे.

५. महात्मा गांधी सेतू – बिहार: बिहारमधील सर्वात लांब असा हा नदीवरील पुल आहे. सदर पुल हा देशातील दुसरा लांब पूल आहे. हा पुल पटणा व हाजीपुर यांना जोडतो.

६. ढोला सादिया ब्रिज – आसाम : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ९ किलोमीटर लांबीच्या या आसाममधील नदीवरील पुलाचे उद्घाटन केले. या पुलाला संगित त्तज्ञ भूपेन हजारिका यांचे नाव दिले आहे.

७. पिर प्नजाल रेल्वे टनल – जम्मू आणि काश्मिर : भारतीय रेल्वेने हिमालय प्रवतराशिंमध्ये सगळ्यात मोठा भोगदा निर्माण केला आहे. हा भोगदा ११.२ किलोमीटर असून तो आशियातील दुसरा आहे.

८. प्नवल नदी, Viaduct – रत्नागिरी : महाराष्ट्रातील रत्नागिरी मधील २४ मी. लांबीचे हे बांधकाम आहे. कोकण रेल्वेनी प्रवास करताना हा इंजिनीअरिंगचा अविष्कार आपल्याला बघायला मिळतो. अशियामधील सर्वात उंच असा हा viaduct आहे.

९. मातृ मंदिर – तामिळनाडू : सोनेरी धातूने बनवलेले हे मंदिर शहराच्या मध्यभागी आहे. या मंदिरात एक सूर्यऊर्जायंत्र बसविण्यात आले आहे. हे मंदिर संगमरवरी असून या मंदिरात मौन पाळावे लागते. मंदिरात एक वातानुकूलित कक्ष आहे जो आभामंडल शोधण्यासाठी उपयोगी आहे.

१०. सिग्नेचर ब्रीज –  नवी दिल्ली : ह्या ब्रीजची रचना कुतुबमीनारपेक्षा दुप्पट उंचीची आहे. हा ब्रीज वजिराबाद आणि पूर्व दिल्लीला जोडतो. हा ब्रीज ‘नमस्ते’ स्वरूपातील केबल स्टाईल ब्रीज आहे.

११. बोगी बिल ब्रीज – आसाम : आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवरील ४.९४ किलोमीटर लांबीचा हा पुल आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा पुल महत्वाचा मानला जातो. हा रस्ता भारतातील पाचवा लांब पुल आहे. धेमाजी ते दिब्रुगड अंतर आता फक्त ३ तासात पार करता येईल.

१२. दुर्गम चेरवू केबल ब्रिज : २३३.८५ मीटर लांबीचा हा पुल जुबिली हिल्सना जोडतो. या पुलामुळे रहदारीवरील ताण कमी होणार आहे.

Top 12 engineering Marvels in India

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण