Tokyo Paralympics सिंहराज अधानाने नेमबाजीत जिंकले कांस्य, भारताच्या खात्यात आता आठ पदके

Tokyo paralympics singhraj singh bronze shooting men 10m Air Pistol SH1

Tokyo paralympics : टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताच्या नेमबाज सिंहराज अधाना याने कांस्य पदक जिंकले. त्याने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल SH1 स्पर्धेत कांस्य जिंकून या खेळांमध्ये भारताचे आठवे पदक जिंकले. त्याच्यासोबत या स्पर्धेत सहभागी होणारा मनीष नरवाल पात्रता फेरीत अव्वल असूनही पदकापासून वंचित राहिला. मनीष नरवाल अंतिम फेरीत सातव्या स्थानावर राहिला. चीनचा गतविजेता चाओ यांग (237.9 पॅरालिम्पिक विक्रम) सुवर्ण आणि हुआंग झिंग (237.5) ने रौप्यपदक जिंकले. Tokyo paralympics singhraj Adhana Wins bronze in shooting men 10m Air Pistol SH1


वृत्तसंस्था

टोकियो : टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताच्या नेमबाज सिंहराज अधाना याने कांस्य पदक जिंकले. त्याने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल SH1 स्पर्धेत कांस्य जिंकून या खेळांमध्ये भारताचे आठवे पदक जिंकले. त्याच्यासोबत या स्पर्धेत सहभागी होणारा मनीष नरवाल पात्रता फेरीत अव्वल असूनही पदकापासून वंचित राहिला. मनीष नरवाल अंतिम फेरीत सातव्या स्थानावर राहिला. चीनचा गतविजेता चाओ यांग (237.9 पॅरालिम्पिक विक्रम) सुवर्ण आणि हुआंग झिंग (237.5) ने रौप्यपदक जिंकले.

SH1 प्रकारात नेमबाजांनी एका हाताने पिस्तूल धरतात. त्यांना एका हातात किंवा पायात विकार असतो. यामध्ये नेमबाज नियमानुसार बसून किंवा उभे राहून लक्ष्य साधतात. टोकियोमध्ये नेमबाजीत भारताचे हे दुसरे पदक आहे. याआधी अवनी लेखारा यांनी R-2 महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 मध्ये सुवर्णपदक जिंकले.

स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन भारतीय

स्पर्धेच्या अंतिम आठ खेळाडूंमध्ये भारताचे दोन आणि चीनचे तीन, यूएसए, पोलंड आणि आरओसीचे 1-1 खेळाडूंचा समावेश होता. या स्पर्धेचे सोने आणि चांदी चीनकडे गेली. सकाळीच युवा भारतीय खेळाडू मनीष नरवालने पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावले होते. त्याचे आणि चीन लो जियालोंग दोघांचे 575 गुण होते. त्याचबरोबर या फेरीत सिंहराज सहाव्या स्थानावर आहे. त्याचा स्कोअर 569 होता. मनीष नरवाल अंतिम फेरीत सातव्या स्थानावर राहिला.

Tokyo paralympics singhraj Adhana Wins bronze in shooting men 10m Air Pistol SH1

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात