विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तब्बल ४१ वर्षांनी भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ग्रेट ब्रिटेन वर ३-१ ने मात करत भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपली पदकाची आशा कायम ठेवली आहे. Tokyo Olympics: Semifinals for the first time in 41 years: Indian hockey team wins; Bowed to Great Britain
Chak De India🇮🇳 Indian men's hockey team marches on to the semifinal🔥🔥They beat Britain 3-1 and booked a spot to the penultimate game🇮🇳#Olympics #Tokyo2020 #TeamIndia pic.twitter.com/rptolVdNnb — IFTWC – Indian Football (@IFTWC) August 1, 2021
Chak De India🇮🇳
Indian men's hockey team marches on to the semifinal🔥🔥They beat Britain 3-1 and booked a spot to the penultimate game🇮🇳#Olympics #Tokyo2020 #TeamIndia pic.twitter.com/rptolVdNnb
— IFTWC – Indian Football (@IFTWC) August 1, 2021
भारतीय संघाने सामन्यात आक्रमक सुरुवात केली. स्पर्धेत आव्हान कायम राखण्यासाठी भारताला या सामन्यात विजय आवश्यक होता. गोलकिपर पी.आर.श्रीजेश आणि बचावफळीने इंग्लंडचे सर्व हल्ले परतवून लावले.
इंग्लंडचा बचाव भेदून पेनल्टी एरियात प्रवेश करत भारताच्या गुरजंत सिंहने आणखी एक गोल करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. सुदैवाने मध्यांतरापर्यंत भारताने आपली २-० ची आघाडी कायम ठेवत इंग्लंडवर दडपण कायम ठेवलं.
हार्दिक सिंगने निलकांत शर्माच्या सहाय्याने इंग्लंडचा बचाव भेदत ५७ व्या मिनीटाला गोल करत भारताची आघाडी ३-१ अशी आणखी मजबूत केली. यानंतर सामना संपायला अवघं दीड मिनीट शिल्लक असताना भारतीय खेळाडूंनी बॉल इंग्लंडच्या हाफमध्ये राहिल याची काळजी घेतली. सामना संपायला अखेरची ५० सेकंद बाकी असताना इंग्लंडला आणखी एक संधी मिळाली, परंतू त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. ३-१ च्या फरकाने भारताने सामन्यात बाजी मारत भारतीय हॉकीने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतासमोर बलाढ्य बेल्जिअमचं आव्हान असणार आहे.
टोकियोत मनप्रीत सिंगच्या भारतीय संघाने आज इतिहासाची नोंद करत पुन्हा एकदा पदकाच्या आशा जागवल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App