विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली:भारताला सर्वाधिक आशा असणाऱ्या महिला बॅडमिंटन स्पर्धेत स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने आणखी एक विजय मिळवला आहे. सिंधूने हाँग काँगच्या चीयूंगा नगनला सरळ सेट्समध्ये नमवत हा विजय मिळवला असून सिंधूचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. या विजयासोबतच तिने बाद फेरीत जागाही मिळवली आहे.
सिंधू आणि चीयूंगा यांच्याचत झालेल्या सामन्यात सिंधूने 21-9 आणि 21-16 अशा सरळ दोन सेट्समध्ये विजय मिळवत सामना आपल्या नावे केला.केवळ 35 मिनिटं चाललेला हा सामना सिंधूसाठी स्पर्धेत आव्हान कायम ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. सिंधूकडून टोक्यो ओलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देण्याची सर्वाधिक आशा आहे. बॅडमिंटन खेळात तर ती एकमेव खेळाडू आहे जी यंदा पदक मिळवून देऊ शकते.
पहिल्या सामन्यात इस्रायलच्या पोलिकारपोवा कसेनियाला 21-7 आणि 21-10 अशा सरळ सेट्समध्ये नमवल्यानंतर आजचा दुसरा सामनाही सिंधूने जिंकला आहे.
जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या सिंधूला बाद फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डटचा सामना करायचा आहे. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये सिंधूने मियाला ४ वेळा हरवलं आहे तर मिया फक्त एकदाच यशस्वी झाली आहे. थायलंड ओपन स्पर्धेत मियाने यंदाच्या वर्षी सिंधूला हरवलं होतं. आपल्या पहिल्या सामन्यात सिंधूने इस्राईलच्या क्सेनिका पोलिकार्पोवाचा पराभव केला होता.
हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात सिंधूने आपल्या बॅकहँडचा सढळहस्ते वापर करत प्रतिस्पर्धी खेळाडूला चांगलंच दमवलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App