विशेष प्रतिनिधी
कोलकाता : याला म्हणतात, हात दाखवून अवलक्षण… गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांच्या सुप्रसिध्द विश्व भारतीय विद्यापीठाचा शताब्दी समारंभ… त्याचे निमंत्रण असूनही गेल्या नाहीत… वरती त्यांच्या पक्षाने निमंत्रण दिलेच नसल्याचा कांगावा केला… आणि अवघ्या काही वेळातच तोंडावर पडायची पाळी आली… किंबहुना पक्षाचा मुखभंग झाला कारण विद्यापीठाने निमंत्रणाची अधिकृत कॉपीच सोशल मीडियावर फडकवून दाखविली…. हा हात दाखवून अवलक्षण करून घेण्याचा प्रकार घडला… पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बाबतीत. TMC says CM Mamata Banerjee wasn’t invited for the Visva Bharati Foundation day event.
आजच्या शताब्दी समारंभाला त्या गेल्या नाहीत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी… त्यांनी दिल्लीतून व्हर्च्यूअली सर्वांना संबोधित केले… इथेच ममतांची राजकीय पंचाइत झाली. मोदींच्या बरोबरीने समारंभात सहभागी होणे त्यांना रूचले नसावे. म्हणून त्यांनी ट्विटरद्वारे विद्यापीठाला शुभेच्छा देऊन गुरूदेवांच्या मार्गाने अनुसरण करण्यास सांगून आपल्या राजकीय मार्गाच्या अनुसरण करायला लागल्या… पण त्यांच्या तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या मार्गात माशी शिंकायला लावली…
त्याचे झाले असे… तृणमूळच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले, की म्हणे विश्व भारती विद्यापीठाने ममतांना आमंत्रणच दिले नाही… त्यांचा अपमान केला… पत्रकार परिषदेत हा कांगावा झाल्याबरोबर सोशल मीडियावरही त्याची चर्चा सुरू झाली… विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांपर्यंत ही बातमी पोहोचयला वेळ लागला नाही… ते चक्रावले… आपण निमंत्रण देऊनही ममता बॅनर्जी आल्या नाहीत… त्यांनी ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या… इथपर्यंत ठीक आहे…
पण एकदम पत्रकार परिषद घेऊन निमंत्रणच दिले नसल्याचा कांगावा… हा काय प्रकार आहे… मग विद्यापीठाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कुलगुरूंच्या स्वाक्षरीने पाठविलेले निमंत्रणच सोशल मीडियावर फडकावले. सगळ्या मीडियाने ते उचलले, सोशल मीडियावर ते शेअर केले… त्यातून ममतांच्या तृणमूळ काँग्रेसचा मानभावीपणा तर उघडा पडलाच पण ज्या मोदींबरोबर एकत्र कार्यक्रमात सहभागी व्हायला नको म्हणून विश्व भारतीय विद्यापीठात जाणे टाळले आणि ट्विटरवर शुभेच्छा दिल्या त्याही अशा वाया गेल्या… उताविळ पक्ष नेत्यांमुळे त्यांना हात दाखवून अवलक्षण करवून घेण्याची वेळ आली…
एका ऐतिहासिक क्षणी सन्मानाने उपस्थित राहण्याची संधी अशी उतावळेपणाने गमावली आणि राजकीय मूसळही केरात जायची वेळ पाहावी लागली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App