तामिळनाडूच्या राजकारणात अळगिरींचा वेगळा रस्ता; 3 जानेवारीला समर्थकांच्या मेळाव्यात घेणार निर्णय


वृत्तसंस्था

चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री कै. करूणानिधींचे दुसरे चिंरंजीव एम. के. अळगिरी यांनी वेगळा रस्ता निवडण्याची घोषणा केली आहे. कोणत्याही स्थितीत एम. के. स्टॅलिन आणि त्यांच्या नेतृत्वाखाली द्रमूक यांच्याशी समझोता करणार नाही, हे अळगिरींनी स्पष्ट केले आहे. येत्या 3 जानेवारीला समर्थकांच्या मेळाव्यात पुढच्या राजकीय वाटचालीचा निर्णय घेणार असल्याचे अळगिरींनी म्हटले आहे. karunanidhis son alagiri chooses differnt political path

डॉ. मनमोहन सिंग यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात रसायन मंत्री राहिलेल्या अळगिरींनी कायमच स्टॅलिन यांच्यापासून अंतर राखत राजकारण केले आहे. मदुराई या त्यांच्या मतदारसंघात त्यांनी स्टॅलिन यांना कधी हस्तक्षेप करू दिला नाही. पण एकूण तामिळनाडूच्या राजकारणात त्यांना स्टॅलिन यांच्या सारखी साख जमवता आलेली नाही. karunanidhis son alagiri chooses differnt political path

आता विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अळगिरींनी वेगळा राजकीय रस्ता स्वीकारायचे ठरवलेले आहे. त्यांची कदाचित भाजपशी युती होऊ शकते, अशीही चर्चा आहे. त्यासाठी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेऊ शकतात, असे तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. सध्या अण्णा द्रमूकचे मुख्यमंत्री पळणीस्वामी यांनी केंद्रात भाजपशी जुळवून घेतले आहे.

karunanidhis son alagiri chooses differnt political path

मध्यंतरी तामिळनाडूतील मोठ्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन यासाठी अमित शहांच्या बरोबर ते कार्यक्रमात वावरले आहेत. त्यानंतरच्या अमित शहांच्या दौऱ्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला आहे.  या पार्श्वभूमीवर अळगिरी यांची पुढच्या चालीची दिशा तामिळनाडूचे संपूर्ण राजकारण नव्हे, तर खुद्द त्यांची राजकीय वाटचाल स्पष्ट करणारी ठरेल.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण