विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज सकाळी सभागृहात जो प्रकार घडला आणि त्यावर झालेली शिक्षा पाहता सरकार हे तालिबानी संस्कृतीला लाजवेल, असे वागले आहे. शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे महाराष्ट्रात नवे तलीबानी असून ते आता महाराष्ट्रात राज्य करू पाहतायत. याचा मी जाहीर निषेध करतो. कारण मी किंवा माझ्या सहकाऱ्यांनी भास्कर जाधव यांना शिवी दिली नाही, असे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी सांगितले. This is the Taliban Thackeray government: Ashish Shelar; Criticism of the government after the suspension action
तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की अन् शिवीगाळ प्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
तालिबानी ठाकरे सरकारचं अभिनंदन, नो बॉलवर विकेट काढणाऱ्यांना सभागृहाबाहेर पळता भुई थोडी करेल. मी पीठासीन अधिकाऱ्याजवळ गेले होते. मी त्यांना तेथून खाली खेचून आणले. ते व्हिडीओ रेकॉर्डमध्ये पाहता येईल. प्रेस गॅलरीनेही पहिले आहे. ओबीसी समाज आरक्षण बोलू न दिल्यामुळे त्रागा व्यक्त करणाऱ्या सदस्यांना जागेवर बसविण्याचे काम केले.हे सभागृहाने पाहिले. तसेच अध्यक्षांचे दालनात शवी देणारे सदस्य भाजपचे नव्हते.
Tweets by ShelarAshish
तरी भास्कर जाधव यांना तसे वाटले असेल तर मी त्यांची सदस्यांच्या वतीने क्षमा मागतो, असे आशिष शेलार यांनी सांगितले. त्यांनी सुद्धा मान्य केले की पक्षाच्या वतीने शेलार यांनी क्षमा मागितली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App