मनी मॅटर्स : नेहमीच उत्पन्नाच्या तीस टक्के बचत ही कराच


जगात श्रीमंत झालेल्या लोकांकडे एक महत्वाचा गुण असतो तो म्हणजे मिळालेला पैसा ते फार योग्य पद्धतीने वापरतात, खर्च करतात, गुंतवतात. यालाही एक कसब लागते. कमावलेले पैसे योग्य पद्धतीने गुंतवून त्यातून पुन्हा अधिक कमाई करणे स्वतःच्या हिमतीवर स्वतचा बिझनेस सुरु करणे आणि तो मोठा करणे, त्यातून भरपूर नफा मिळवणे पैसे सांभाळणे ही सर्व यशस्वी माणसाची लक्षणे आहेत.Thirty percent of the income is always saved

भरपूर पैसा कमावणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण ते पैसे मिळाल्यावर त्यांना योग्य प्रकारे सांभाळणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. पैसे कमवायचेच आहेत तर त्यासाठी विविध मार्ग आज उपलब्ध आहेत. पण या मार्गात सुद्धा अनंत टप्पे येतात. त्या टप्प्यांनुसार जर आपण पैशांची नीट काळजी घेतली तर नक्कीच आपण लवकर श्रीमंत होऊ शकतो. खूप पैसे कमावण्याच्या मार्गातील पहिल्या टप्प्यामध्ये येते ते म्हणजे सगळ्यात पहिले पैसे कमावणे. पैसे कमावण्यासाठी प्रयत्नच केला नाही तर आपल्याकडे पैसे कसे येतील.

त्यामुळे आधी पैसे कमावण्याचे विविध मार्ग शोधावे. पैसा निर्माण करावा. जर बिझनेस करण्याची इच्छा असेल तर स्वतचा बिझनेस सुरु करावा. त्यातून पैसा कमवावा. एकदा की तुमच्या कडे पैसे आले की मग तुम्ही पुढच्या वळू शकता. दुसऱ्या टप्प्यात येते ते म्हणजे कमावलेले पैसे वाचवणे. एका मोठ्या बिझनेसमनने म्हंटले आहे की, तुम्ही जे पैसे कमवता, तुमच्या त्या कमाई मधील तीस टक्के पैसा तुम्ही सेव्ह केला पाहिजे.

त्यामुळे सर्वसामान्यपणे आपल्या उत्पन्नााच्या किमान ३० टक्के बचत करावी. हे अगदी खरे आहे. आपल्या एकूण सर्व खर्चामधून होणारा वायफळ खर्च कमी करायला हवा आणि जास्तीत जास्त लक्ष बचतीकडे द्यायला हवे. तुम्ही जितके पैसे वाचवाल तितके तुमचे सेविंग्स जास्त होतील. तोच पैसा तुमच्या कामाला येईल. जेवढी जास्त बचत तेवढे लवकर तुम्ही श्रीमंत व्हाल. त्यामुळे पैशाची सतत बचत करा. आणि तो बचत केलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवा. त्यातच खरे हित आहे.

Thirty percent of the income is always saved

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात