सावरकर युग आणि मोदी युग यात भेद नाहीच ते एकच!! देवेंद्र फडणवीस यांचे नि:संदिग्ध प्रतिपादन

प्रतिनिधी

मुंबई : भारताने जेव्हा बोटचेपे धोरण स्वीकारले, तेव्हा भारताने भूभाग गमावला आणि चीनने तो गिळंकृत केला, पण पहिल्यांदा डोकलाममध्ये भारताने चीनला मागे सारले, तेव्हाही जर बोटचेपेपणा करत ‘हिंदी-चिनी भाई भाई’ केले असते, तर चीन पुढे सरकला असता. डोकलाममध्ये जी सावरकर नीती अवलंबली होती, तिच नीती सर्जिकल स्ट्राईक करताना अवलंबली होती.There is no difference between the Savarkar era and the Modi era

भारताच्या सैन्यावर हल्ला केल्यावर पाकिस्तानात घुसून त्यांना ठार केले आणि पाकिस्तान गप्प राहिले, तेव्हा खऱ्या अर्थाने वीर सावरकर यांच्या विचारांचा विजय झाला होता. कारण मोदी युग आणि सावरकर युग यात भेद नाहीच ते एकच आहे, असे विधान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

काँग्रेसच्या मुस्लिम लांगुलचालनाचे परिणाम आजही आपण भोगत आहे. त्रिपुरातील घटनेचे राहुल गांधींनी भांडवल केले आणि महाराष्ट्रात हजारोंच्या संख्येने मोर्चे निघाले, हिंदूंची घरे जाळली. त्यावर निधर्मी गप्प असतात, त्यावर प्रतिक्रिया देणाऱ्यांवर मात्र टीका करतात. हे लांगुलचालन थांबवायचे असेल, तर वीर सावरकर यांचे विचार आत्मसात करावे लागतील. शहरी नक्षलवाद हीदेखील लांगुलचालनाची पिलावळ आहे.


भारतात सावरकर युग सुरू झालेय, भारतरत्नपेक्षाही त्यांचे व्यक्तीमत्व मोठे, केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर यांचे प्रतिपादन


आदिवासींचे ब्रेनवॉश करून समाज संपवण्याचे हे कारस्थान आहे. हा प्रयोग जर संपवायचा असेल, तर त्याचे उत्तर हिंदुत्वामध्ये आहे. हिंदुत्व जागृत झाले, तरच विकास होईल, राष्ट्रवादाचे हेच हिंदुत्व सावरकर यांनी मांडले आहे, ते आत्मसात केले नाही, तर भारतात सर्वत्र प. बंगाल होईल आणि ममता बॅनर्जी यांच्यासारखे नेते निवडून आले तर मुस्लिमांचे लांगुलचालनच होत राहील, असा इशारा फडणवीस यांनी दिला. सावरकर हे विद्यापीठ आहे.

मागील काळापेक्षा आजच्या पिढीला वीर सावरकर यांच्या विचारांची गरज आहे, कारण इतिहासातून आपण शिकलो नाही, तर आपल्याला वर्तमान राहील पण भविष्य उरणार नाही, हा विचार हे पुस्तक अधोरेखित करत आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर लिखित ‘वीर सावरकर : द मन हू कूड हॅव प्रिवेंटेड द पार्टीशन’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाचे सह लेखक हे सुप्रसिद्ध कवी चिरायू पंडित आहेत. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर, सह लेखक चिरायू पंडित, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, भाजपाचे नेते आशिष शेलार आणि भाजपचे नेते अतुल भातखळकर उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थितीत मान्यवरांचे अंदमान कारागृहातील कोल्हूचे प्रतिकात्मक स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या आरंभी पुस्तकाविषयी संक्षिप्त माहिती देणारी छोटी चित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर मान्यवरांनी व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. प्रसिद्ध गायिका मुग्धा वंशपायन यांनी वीर सावरकर यांनी लिहिलेले ‘ने मजसी ने परत मातृभूमीला। सागरा प्राण तळमळला’ हे गीत गायले.

There is no difference between the Savarkar era and the Modi era

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात