आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक वेगाने फिरत असते. मग त्यावर प्रवासी कसे उतरतात असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. मात्र यामागे खऱ्या अर्थाने सायन्स आहे. अवकाश स्थानक म्हणजे एक प्रकारचा कृत्रिम उपग्रहच आहे. तो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३८० किलोमीटर उंचीवरून पृथ्वीभोवती प्रचंड वेगानं प्रदक्षिणा घालतो आहे. या स्थानकाचा वेग इतका आहे की ते अवघ्या ९२ मिनिटात एक पृथ्वीप्रदक्षिणा पुरी करते. या स्थानकात एका वेळेस जास्तीत जास्त सहा अंतराळवीर राहू शकतात. हे स्थानक अवाढव्य म्हणता येईल अशा आकाराचं असते. त्याची लांबी ७३ मीटर तर रुंदी १०८ मीटर तर उंची २० मीटर असते.The space station orbits the entire Earth in just 92 minutes
साहजिकपणे त्याचे वजनही प्रचंड म्हणजे साडेचार लाख किलो एवढं असते. त्यामुळे पृथ्वीवरून त्याचं उड्डाण कशा पद्धतीनं झाले असेल असा प्रश्न तुमच्यापुढे उभा राहील. अतिशय आश्चर्याची गोष्ट म्हणजे या स्थानकाचे वेगवेगळे घटक वेगवेगळ्या वेळी अंतराळात सोडण्यात आले आणि त्यांची जुळणी अंतराळात म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३८० किलोमीटर उंचीवर करण्यात येते.
तंत्रज्ञानाची कमाल म्हणतात ती हीच. या स्थानकाचा पहिला घटक १९९८ साली अंतराळात सोडण्यात आला आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं इतर घटक सोडण्यात आले किंवा स्पेस शटलबरोबर तेथे पाठवण्यात आले. आजपर्यंत ३५ अवकाश मोहिमांमधून २०४ अंतराळवीरांनी या स्थानकात मुक्काम केला आहे. हे स्थानक रशियातल्या बैकानूर येथील अंतराळ तळावरून सोडण्यात आलं आहे.
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक ७७०० मीटर प्रतिसेकंद एवढय़ा प्रचंड वेगाने पृथ्वीभोवती फिरत असून ते २४ तासांत १६ प्रदक्षिणा पूर्ण करतं. साहजिकपणं तेथे असलेल्या अंतराळवीरांना २४ तासांत १६ सूर्योदय आणि १६ सूर्यास्त बघायला मिळतात. म्हणजे जणू काही २४ तासांत त्यांचे १६ दिवस सामावलेले आहेत. कल्पनाही करता येणार नाही असा हा अनोखा प्रकार अनेक अंतराळवीरांनी प्रत्यक्ष अनुभवला आहे. अर्थात त्यांचा दिनक्रम २४ तासांचा कालावधी लक्षात घेऊनच आखलेला असतो. परंतु या विचित्र परिस्थितीचा त्यांच्या शरीरावर आणि मनावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळं त्यांना विशेष प्रशिक्षण दिलेलं असते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App