दीदी, बंगालचा भूमिपुत्रच तुम्हाला हरवून मुख्यमंत्री होईल; अमित शहांचा इशारा


वृत्तसंस्था

बोलपूर : “ममता दीदी तुम्ही कितीही भ्रम फैलावा. बंगालच्या मातीतलाच भूमिपुत्रच तुमच्याविरूद्ध उभा राहील आणि तुम्हाला पराभूत करेल. बंगाल हा संकुचित विचारांचा प्रदेश नाही. तो विशाल आणि व्यापक विचार देणारा प्रदेश आहे. the son of soil of bengal will defeat mamata banerjee and will become CM

ममता दीदी काँग्रेसमध्ये होत्या त्यावेळी इंदिराजी, प्रणवदा, नरसिंह राव जेव्हा बंगालमध्ये येत होते, तेव्हा ममता दीदी त्यांना “बाहेरचे” म्हणून संबोधत होत्या का? मग आम्ही आलो तर “बाहेरचे” कसे?”, असा खडा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केला. the son of soil of bengal will defeat mamata banerjee and will become CM

बंगाल बाहेरचे लोक येथे येऊन अशांतता माजवताहेत, असा आरोप ममतांनी करत आहेत. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला अमित शहांनी वरील उत्तर दिले. ते म्हणाले, ममता दीदी कदाचित विसरल्या असतील, त्या काँग्रेसमध्ये होत्या तेव्हा काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते बंगालला भेट द्यायचे.

ते काय बाहेरचे होते काय? ममतांचा विचार एवढा संकूचित कसा झाला? एका प्रांतातली व्यक्ती दुसऱ्या प्रांतात जाऊ नये, असे त्यांना वाटते का? इथे दिलीप घोष, स्वपनदांपासून सगळे नेते बसलेत. ते बंगाली नाहीत का? ममतांविरोधात बंगालचाच भूमिपुत्र उभा राहील आणि त्यांना पराभूत करून बंगालचाच भूमिपुत्रच मुख्यमंत्री होईल, असे उद्गार अमित शहा यांनी काढले.

the son of soil of bengal will defeat mamata banerjee and will become CM

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर ज्या प्रकारे तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांनी हल्ला केला त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. पण मी तृणमूळच्या नेत्यांना सांगू इच्छितो, असे हल्ले करून भाजपला रोखता येणार नाही. आम्ही पश्चिम बंगालमध्ये आमचा पाया मजबूत केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही अमित शहा यांनी दिला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण