सध्या थंडीचे दिवस सुरु झाले असले तरी जेथे कडक उन असते तेथे कुलर वापरलाच जातो. मात्र हे कुलर केस काम करतात. त्यामुळे कसे काय थंड वाटते याची माहिती अनेकांना नसते. कूलर म्हणून बाजारात जी उपकरणे विकली जातात ती सर्व उपकरणे हवेतील म्हणजेच खोलीतली आद्रता वाढविण्यास मदत करतात. वैज्ञानीक भाषेत ह्यांना ह्युमिडीफायर्स म्हणतात. हि उपकरणे खोलीतील उष्णता कमी करत नाहीत. आपल्याला जो गारवा जाणवतो तो वाढीव आर्द्रतेचा, हवेच्या झोताचा परिणाम असतो. अंगातली उष्णता घामाच्या बाष्पिभवनाद्वारे हवेत विलीन होते. The Secret of Science: Why Coolers Make Air Cool
बाह्यहवेचे तापमान ३४ सेल्सियस असलं तरीही ३२ सेल्सियस असल्याचा भास होतो. हवेचा सरळ झोत अंगावर येत असेल तर कदाचित ३ सेल्सियस असल्याचाही आभास होईल. हा आभासी तपमान, अंगावरुन वहाणार्या वार्याीचा आणि आर्द्रतेचा संयुक्त आभासी परिणाम असतो. खरे तर कूलर वापरण्यासाठी हवाबंद खोलीची गरज लागत नाही, पण नियंत्रीत वायुविजन असावं. पंख्याखाली बादलीत, परातीत पाणी ठेवूनही आर्द्रता वाढवीता येते. अमेरिकेत केलेल्या एका अभ्यासानुसार आपल्या सोयीकरता २२.७॰ से.- २५॰ से. तपमान आणि २५ ते ६० टक्के सापेक्ष आर्द्रता असली पाहीजे.
आता आपल्या लक्षात आलेच असेल की ज्या ठिकाणी आपल्या सभोवतालची सापेक्ष आर्द्रता ६० टक्क्यांपेक्षा जास्त असेल (उदा. मुंबई किंवा कोंकण किनारा) तर कूलरचा परिणाम शुन्यवत होतो. एखाद्या ठिकाणी कूलरचा परिणाम जाणवेल तर इतर ठिकाणी काहींही परिणाम जाणविणार नाही. ह्याच कारणांकरता कूलरच्याविषयी अती विरोध विधाने, म्हणजे बेकार पासुन छान पर्यंत, ऐकायला मिळतात.
एअर कंडिशनर खोलीतली उष्णता बाहेर फेकण्याचे किंवा उष्णता निर्माण करण्याचे, त्याबरोबरच आर्द्रता नियमित करण्याचे कार्य करतात. म्हणजेच हि उपकरणे खर्यार अर्थाने आपल्या सोयीकरता बनविलेली असतात, कोणत्याही ठिकाणी वापरता येतात. आपल्या भागातली सापेक्ष आर्द्रता तीस टक्क्यांपेक्षा कमी असेल तरच कूलरचा मर्यादीत प्रमाणात उपयोग होईल. हैदराबाद, नागपूर वगैरे ठिकाणी कुलर त्यामुळे जास्त प्रभावी ठरतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App