विषबाधा नेमकी कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट नाही.परंतू खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने पाणी आणि अन्नाचे नमुने घेतले आहेत. Pune: Food poisoning of 48 students of Navguru Sansthan; Nature stable
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील खोपी गावात नवगुरू संस्थानच्या ४८ विद्यार्थीनींना अन्नातून विषबाधा झाली आहे. दरम्यान विषबाधा झालेल्या ४८ विद्यार्थींनींपैकी २२ विद्यार्थीनींवर भोर उपजिल्हा रुग्णालयात तर २० मुलींवर नसरापूर आरोग्य उपकेंद्रात उपचार सुरू असून उर्वरित सहा विद्यार्थ्यांवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर आहे.
विषबाधा नेमकी कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट नाही.परंतू खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने पाणी आणि अन्नाचे नमुने घेतले आहेत.या मुली संस्थेच्या जवळ असलेल्या वसतीगृहात राहतात.यातील बहुतांश मुली या परराज्यातील आहेत. त्या शिक्षणासाठी या संस्थेत आल्या आहेत. या सर्व मुली नवगुरू संस्थेत सॉफ्टवेअर व्यावसायिक म्हणून प्रशिक्षण घेत आहेत.
आरोग्य अधिकारी डॉ. अनंत साबणे यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री जेवण केल्यानंतर यातील चार-पाच मुलींना पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला.दरम्यान मंगळवारी यापैकी अनेक विद्यार्थिनींना हा त्रास वाढल्याने त्यांना नसरापूर येथील आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. या सर्व मुलींची प्रकृती स्थिर आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App