विशेष प्रतिनिधी
इटानगर : अरुणाचल प्रदेशात जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने अक्षरशः एकतर्फी विजय मिळविला जिल्हा परिषदांमध्ये २३७ जागांपैकी १८५, तर ग्रामपंचायतींमध्ये ८१०० जागांपैकी ६०५० जागा जिंकल्या. यातील बहुतेक जागा बिनविरोध जिंकलेल्या आहेत. इटानगर आणि पासीघाट या दोन्ही महापालिकांवर भाजपचा भगवा फडकला आहे. The only and only bjp in Arunachal
भाजपचे सर्वंकष वर्चस्व दाखविणारा हा चार्ट
काँग्रेसचे अस्तित्व तर जवळपास संपल्यातच जमा आहे. थोडेफार यश मिळविले आहे ते बिहारमध्ये भाजपचा मित्रपक्ष असलेल्या ‘जेडीयू’ने. पासीघाट नगरपरिषदेच्या (पीएमसी) आठ पैकी सहा जागा जिंकून भाजपने कॉंग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली. इटानगर महापालिका निवडणुकीत प्रथमच भाग घेणाऱ्या जदयूला नऊ जागा मिळाल्या आहेत.
भाजपला 20 पैकी 10 जागा मिळाल्या आणि एनपीपीला एक जागा मिळाली. भाजप बहुमतापासून एक जागेने दूर आहे. इटानगर महापालिकेत भाजपचे 10 पैकी 5 उमेदवार बिनविरोध विजयी झाले. The only and only bjp in Arunachal
पासीघाट नगरपरिषदेच्या (पीएमसी) निवडणुकीत गेल्यावेळी सात जागा जिंकलेल्या कॉंग्रेसला यंदा अवघ्या दोन जागा मिळाल्या. इटानगर महापालिका (आयएमसी) निवडणुकीत कॉंग्रेसला खातेही उघडता आले नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनता दल (युनायटेड) च्या कामगिरीला महत्त्व आहे. कारण अरुणाचल प्रदेशातील सातपैकी सहा आमदार एक दिवस अगोदरच भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App