सरनाईकांपाठोपाठ संजय राऊत..पत्नी वर्षा राऊत यांना पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ‘ईडी’ची नोटीस; ५० लाखांचा व्यवहार संशयास्पद!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) नोटीस बजावली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. तसंच वर्षा राऊत यांना २९ डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचंही समजते. ED issues notice to Varsha Raut in PMC bank scam

वर्षा राऊत यांना 50 लाख रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराबद्दल ही नोटीस दिली जात आहे, असे समजते. ईडीने उचललेल्या या पावलामुळे भाजप आणि शिवसेना व मोदी सरकार आणि पवार – ठाकरे सरकार यांच्यामधील संबंध आणखीनच ताणले जाण्याची शक्यता आहे.

पीएमसी संदर्भात राऊत यांचे आधी काही संबंध होते का याचा खुलासा राऊत करतील का? त्यांनी ईडीला सहकार्य करावं, अशी खोचक प्रतिक्रिया भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

तर दुसरीकडे, भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनीही संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मुंबई पोलीस यंत्रणा वागते त्याचे समर्थन शिवसेना करते आणि ईडी नोटीस आली की सूडाचं राजकारण असं कसं म्हणतात? असा सवाल राम कदम यांनी केला आहे.

ED issues notice to Varsha Raut in PMC bank scam

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण