बिहारमधील समस्तिपूर जिल्ह्यात कोबीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेतातील कोबी नांगरून टाकण्याची वेळ आली होती. मात्र, नव्या कृषि कायद्यामुळे याच कोबीला दहा पट भाव मिळाला आहे. नव्या कृषि कायद्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनात अक्षरश: क्रांती झाली आहे. The new agricultural law revolutionized the lives of farmers
विशेष प्रतिनिधी
समस्तीपुर : बिहारमधील समस्तिपूर जिल्ह्यात कोबीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेतातील कोबी नांगरून टाकण्याची वेळ आली होती. मात्र, नव्या कृषि कायद्यामुळे याच कोबीला दहा पट भाव मिळाला आहे. नव्या कृषि कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात अक्षरश: क्रांती झाली आहे. The new agricultural law revolutionized the lives of farmers
शेतकरी आंदोलनाच्याच काळात बिहारमधील समस्तिपूर जिल्ह्यातील मक्तापूर गावाची कहाणी समोर आली आहे. ओमप्रकाश यादव या शेतकऱ्याला त्याच्या शेतातील कोबीला कवडीमोल भाव मिळत होता. केवळ एक रुपया किलो भावाने कोबी विकला जात होता. त्यामुळे कोबी शेतातून काढून बाजारात घेऊन जाण्यापेक्षा शेतातच नष्ट करण्याची वेळ त्याच्यावर आली होती. त्यामुळे शेतकरी उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवित होते.The new agricultural law revolutionized the lives of farmers
कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या कानावर हे वृत्त आल्यावर त्यांनी आपल्या विभागातील कॉमन सर्व्हिस सेंटरला आदेश देऊन या शेतकऱ्यांशी संपर्क करण्यास सांगितले. त्यांना दुसऱ्या राज्यांत या शेतकऱ्यांचा कोबी विकण्यासाठी मदत करण्यास सांगितले. The new agricultural law revolutionized the lives of farmers
सरकारने कृषि उत्पादनांच्या विक्रीसाठी डिजीटल व्यासपीठ तयार केले होते. त्यावर याबाबतची माहिती दिल्यावर दिल्लीतील एका व्यापाऱ्याने दहा रुपये प्रति किलो कोबी खरेदी करण्याच प्रस्ताव दिला. त्यामुळे ओमप्रकाश यादव यांना कोबीला १० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला.
रविशंकर प्रसाद यांनी याबाबत सांगितले की, शेतकरी आणि व्यापारी यांच्यात व्यवहार झाल्यवर अर्धे पैसे बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बॅंक खात्यावर पोहाचविण्यात आले. या व्यापाऱ्याने कोबी दिल्लीत आणण्यासाठी स्वत: वाहतुकीची व्यवस्था केली आणि उर्वरित अर्धी रक्कमही त्याच्या खात्यात तातडीने जमा केली.
नव्या कृषि कायद्यामुळेच शेतकऱ्याला हा फायदा मिळाला असल्याचे सांगून रविशंकर प्रसाद म्हणाले, नव्या कायद्यामुळे शेतकऱ्याला आपला माल देशात कोठेही विकण्याची परवानगी मिळाली आहे. स्थानिक बाजारात भाव मिळाला नाही तर शेतकरी देशात कोठेही आपला माल विकू शकतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App