शबरीमालात अयप्पाचा कॉंग्रेस, डाव्या आघाडीला तडाखा, महापालिका निवडणुकीत भाजपाचा विजय

महिलांना मंदिर प्रवेश देण्यावरून गाजलेल्या शबरीमाला मंदिर परिसरातील महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि डाव्या आघाडीला जोरदार तडाखा बसला आहे. भारतीय जनता पक्षाला भरभरून जागा देत येथील नागरिकांनी या दोन्ही पक्षांचा दारुण पराभव केला आहे.

वृत्तसंस्था

तिरुअनंतपूरम : महिलांना मंदिर प्रवेश देण्यावरून गाजलेल्या शबरीमाला मंदिर परिसरातील महापालिकेच्या निवडणुकीत भगवान अयप्पानेच कॉंग्रेस आणि डाव्या आघाडीला तडाखा दिल्याची चर्चा केरळात सुरु झाली आहे. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला भरभरून जागा देत नागरिकांनी दोन्ही पक्षांचा दारुण पराभव केला आहे. kerala BJP’s victory in municipal elections

केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. केरळच्या राजकारणात पाय रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला अयप्पाच पावला आहे. भाजपा आघाडीने इथे शबरीमाला मंदिर परिसरातील महापालिका जिंकली आहे. केवळ सत्ताधारी एलडीएफचीच नाही, तर प्रतिस्पर्धी यूडीएफ आणि राजकीय जनाधार भक्कम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपा प्रणीत एनडीएची इथे प्रतिष्ठा पणाला लागली होाती.

पुढच्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात केरळमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांना महत्त्व आहे. केरळमध्ये दरवर्षी आलटून-पालटून एलडीएफ आणि यूडीएफची सत्ता येते. १९८० पासून सुरु असलेला हा ट्रेंड मोडून प्रथमच सत्ता कायम राखण्याचा एलडीएफचा प्रयत्न आहे.

kerala BJP’s victory in municipal elections

काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूडीएफने प्रथमच केरळ काँग्रेस एम शिवाय ही निवडणूक लढवली. राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस कमकुवत झाली आहे. काँग्रेसच्या याच कमकुवत दुव्यांचा फायदा उचलण्याचा एलडीएफचा प्रयत्न असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काँग्रेसची कामगिरी कशी होते, त्यावर २०२१ विधानसभा निवडणुकीचे चित्र अवलंबून असेल.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*