आमदारांनी कचऱ्याचा ट्रॅक्टर आयुक्तांच्या घरासमोर केला खाली ; बेळगावातील धक्कादायक घटना


वृत्तसंस्था

बेळगाव: ‘स्वच्छ बेळगाव, सुंदर बेळगाव’ या संकल्पनेला तडा गेला आहे. शहरात स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे नागरिक संतप्त आणि नाराज झाले आहेत. बेळगाव दक्षिण मतदार संघाचे आमदार अभय पाटील यांनी नागरिकांच्या संतापला वाचा फोडली आहे. त्या अंतर्गत कचऱ्याने भरलेला एक ट्रॅक्टर आयुक्तांच्या घरासमोरच खाली केला. दर रविवारी असा प्रकार केला जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
The MLAs trashed the garbage tractor down in front of the Commissioner’s house; Shocking incident in Belgaum

महापालिकेकडून शहरात स्वच्छतेचे काम योग्य प्रकारे होत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सकाळपासूनच समर्थक आणि कार्यकर्त्यांसह त्यांनी जागोजागचा कचरा जमा करून तो ट्रॅक्टरमध्ये भरला आणि तो थेट बेळगावचे उपनगर असलेल्या विश्वेश्वरनगर येथील महापालिका आयुक्तांच्या घरासमोर टाकला आहे.

सर्वसामान्य जनता परिसरात साचलेल्या दुर्गंधीयुक्त कचऱ्यापासून कशी त्रस्त आहे, याचा अनुभव आयुक्तांनाही यावा यासाठी आमदारांनी ट्रॅक्टरचे स्टेअरिंग हाती घेऊन थेट विश्वेश्वरय्यानगर गाठले. ट्रॅक्टरमध्ये भरलेला कचरा आयुक्तांच्या घरासमोर खाली केला.

अभय पाटील म्हणाले, मीअनेक दिवसांपासून शहर परिसरात साचणाऱ्या कचऱ्याबद्दल आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आयुक्तांना वारंवार कळविले होते शहर परिसर स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा तो कचरा तुमच्या घरासमोर टाकेन, असा इशाराही दिला होता. मात्र, आयुक्तांनी ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे शहर परिसरातील कचऱ्याचे ढिगारे गोळा केले. तो कचरा आयुक्तांच्या घरासमोर टाकण्यास सुरुवात केली आहे.

यापुढेहीस्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यास दर रविवारी आम्ही कचरा जमा करून तो आयुक्तांच्या घरासमोरच टाकला जाईल, असे आमदार अभय पाटील यांनी सांगितले.

आयुक्त जागे होतील; नागरिकांची अपेक्षा

आता आयुक्त जागे होतील आणि स्वच्छता कंत्राटदारांवर अंकूश ठेवून शहर स्वच्छतेकडे गांभीर्याने देतील, आरोग्याची काळजी घेतील ? अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

The MLAs trashed the garbage tractor down in front of the Commissioner’s house; Shocking incident in Belgaum

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”