राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. सत्ताधारी शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 5 वर्षे पूर्ण होण्याआधीच पायउतार व्हावे लागणार आहे. शिवसेनेत फूट पाडणारे सूत्रधार हे एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला जात आहे.The Focus Explainer What exactly is the cause of Eknath Shinde’s revolt? What happens next? Know the answers to the questions in your mind
अशा परिस्थितीत, आजच्या द फोकस एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया एकनाथ शिंदे कोण आहेत? त्यांच्या बंडाची कारणे काय आहेत? पुढे काय होणार?
कोण आहेत एकनाथ शिंदे?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे 1980 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. एक साधा शाखाप्रमुख या पदापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. 2004 मध्ये एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेत होते निवडून आले होते. 2009, 2014 आणि 2021 मध्ये ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा विधानसभेत पोहचले.
म्हणजेच एकनाथ शिंदे चार वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत विधानसभेमध्ये पोहोचले आहेत. 2019 च्या सुरुवातीला त्यांनी आरोग्य खात्याची जबाबदारी देखील सांभाळली होती. एकनाथ संभाजी शिंदे सध्या शिवसेनेचे नेते असून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा झेंडा हाथी घेतला तो आनंद दिघे यांच्यामुळेच. दिघेंनी 1984 मध्ये मध्ये शिंदे यांची किसन नगरच्या शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्या नंतर दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. गरजवंतांना स्वस्तात धान्य उपलब्ध करुन देण्यासाठी केलेले आंदोलन, टंचाईच्या काळात नागरिकांना पामतेल उपलब्ध करुन देणे, नागरिकांच्या समस्यांसाठी प्रशासनाच्या विरोधात अनेक आंदोलने केल्याने शिंदे जनतेचे नेते बनले.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाची नेमकी कारणे काय?
मुंबई-नागपूर दरम्यान बांधण्यात येत असलेला सुपर कम्युनिकेशन हायवे हा फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. समृद्धी महामार्ग नावाचा हा प्रकल्प फडणवीस यांच्या हस्ते शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. उद्धव सरकारमध्येही शिंदे यांच्याकडे हा प्रकल्प आहे, पण त्याचे श्रेय त्यांना दिले जात नाही. काँग्रेससोबत सरकार स्थापनेला विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये शिंदे यांचा समावेश होता. मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी करून उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे खूप नुकसान केल्याचे या गटाचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात शिवसेना हा मराठा अस्मितेसाठी काम करणारा हिंदुत्ववादी पक्ष मानला जातो. पवारांच्या राष्ट्रवादीची प्रतिमा मराठा आणि काँग्रेसचा मुस्लिम समर्थक पक्ष अशी आहे. काँग्रेसच्या या प्रतिमेमुळे शिवसेनेची व्होट बँक कमकुवत झाल्याचे शिंदे म्हणाले होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेतील संजय राऊत, अनिल देसाई आणि आदित्य ठाकरे यांची ताकद चांगलीच वाढली आहे, तर एकनाथ शिंदे बाजूला झाल्यासारखे वाटत होते.
कसे सुरू झाले संकट?
10 जून रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीपासून महाराष्ट्रातील उद्धव सरकारवर संकटाचे ढग दिसू लागले. राज्यसभेच्या 6 जागांवर सत्ताधारी महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना + काँग्रेस + राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ उमेदवार आणि भाजपचे ३ उमेदवार विजयी झाले. जर आपण बघितले तर महाराष्ट्र विधानसभेत भाजपचे फक्त 106 आमदार आहेत, ज्यात अपक्षांचा समावेश धरून ही संख्या 113 पेक्षा जास्त होती, परंतु राज्यसभा निवडणुकीत 123 मते मिळाली, MLC निवडणुकीत 134 मते मिळाली. याचा अर्थ राज्यसभा निवडणुकीत भाजपने सत्ताधारी पक्षाच्या 10 आमदारांना फोडले होते. MLC निवडणुकीत भाजपला 134 मते मिळाली. म्हणजेच आतापर्यंत सत्ताधारी पक्षाचे 21 आमदार भाजपसोबत आले होते.
ठाकरे सरकार पडल्यावर काय होणार?
महाविकास आघाडीतून 30-40 आमदार बाहेर पडल्यास सरकार अल्पमतात येईल. विरोधी पक्ष भाजप सभागृहात बोलावून अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न करणार. यात राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असेल. सभागृहात बहुमत सिद्ध करण्याची पाळी आली, तर सभापतींची भूमिका सर्वात खास असेल. कर्नाटक आणि उत्तराखंडसारख्या राज्यांमध्ये हे प्रकरण न्यायालयात गेले होते. महाराष्ट्रातही हीच शक्यता आहे.
शिवसेनेने जळगाव महापालिकेत जे केले, तेच भाजपने राज्यात केले
आज राज्यातील शिवसेनेत जी परिस्थिती निर्माण झाली आहे. तशीच परिस्थिती गेल्या वर्षी मार्च महिन्यात जळगाव महापालिकेत निर्माण झाली होती. महापौर निवडणुकीच्या निमित्ताने जळगाव महापालिकेत शिवसेनेकडे 15 नगरसेवक असताना भाजपचे 27 नगरसेवक गळाला लावत सत्ता मिळवली होती. यामुळे भाजपत मोठी फूट पडली होती. भाजप 30 निष्ठावान नगरसेवकांच्या विरोधात 27 बंडखोर अशी दुफळी निर्माण झाली होती. दरम्यान, वर्षभराच्या कालखंडात नगरसेवकांचे भाजपतून शिवसेनेकडे जाणे व शिवसेनेतून भाजपत येण्याचे प्रकार सुरूच आहेत.
यात भाजप व बंडखोर नगरसेवकांमध्ये गटनेता पदावरून वाद निर्माण झाला आहे. दोन्ही गटांकडून आपलाच गटनेता अधिकृत असल्याचा दावा केल्याने त्याचा निवाडा करण्यासाठी थेट औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय लागलेला नाही. भाजपचे २७ नगरसेवक फोडण्याच्या प्रक्रियेत स्थानिक पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदे यांनीच बळ दिले होते. शिंदे यांच्या नजरकैदेत नगरसेवकांना ठाणे येथे हॉटेलात ठेवण्यात आले होते. आताही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना आमदारांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. शिंदे सांगतील तीच पूर्व दिशा अशीच भूमिका शिवसेना आमदारांनी घेतली आहे. दोन्ही घडामोडीत शिंदेच केंद्रस्थानी राहिले.
ऑपरेशन कमळसाठी अमित शहांचा नाशिक दौरा रद्द….?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सोमवार आणि मंगळवारी नियोजित असलेला नाशिक व त्र्यंबकेश्वर दौरा रविवारी रात्री अचानक रद्द झाला तेव्हा त्यासाठी अग्निपथ धोरणाविरोधातील आंदोलनाचा संदर्भ दिला जात होता, मात्र त्यामागचे इंगित एकनाथ शिंदे यांच्या बंडाची पार्श्वभूमी असल्याची चर्चा आता भाजपच्या अंतर्गत गोटात रंगू लागली आहे. एकप्रकारे हादौरा रद्द होणे ही बाब राज्यातील महाविकास आघाडी सरकारसाठी अग्निपथ ठरला असल्याचे म्हटले जात आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड, त्यामुळे धोक्यात आलेले महाविकास आघाडी सरकार या सर्वांची कुणकुण शिवसेना व दोन्ही काँग्रेसमधील चाणक्यांना कशी लागली नाही, असा प्रश्न असताना शहा यांनी सर्व चाचपणी करून निश्चित केलेला प.पू. मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या भूमिपूजनाचादौरा अचानक रद्द करण्यामागे महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन लोटस’चे कारण होते, असाही ठाम दावा या पक्षातील सूत्रांकडून केला जात आहे.
पुढे काय होणार?
शिवसेनेतील 35 आमदार फोडून एकनाथ शिंदेंनी ठाकरे सरकारला मोठा धक्का दिला. आणखीही काही आमदार शिंदेंच्या संपर्कात असून त्यांच्यासह स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी त्यांनी केली आहे. शिवसेनेचे 55 आमदार आहेत. पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश म्हणजे 37 आमदारांनी पक्ष सोडला तर त्यांच्या आमदारकीला धोका राहत नाही. याच नियमाचा आधार घेत शिंदे आमदारांचा स्वतंत्र गट तयार करणार आहेत. अल्पमतात आलेले ठाकरे सरकार पायउतार होताच शिंदेंचा हा गट भाजपला पाठिंबा देईल. भाजपचे 106 व 28 समर्थक आमदार आणि शिंदेंचा गट मिळून सत्ता स्थापन करून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. या बदल्यात शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद व त्यांच्या गटाला 9 ते 10 मंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती शिंदेंच्या निकटवर्तीयांनी दिली.
अन्यथा मध्यावधीचा पर्याय : एकनाथ शिंदे गट स्थापन करू शकले नाही तर त्यांच्यासह समर्थक आमदार राजीनामे देतील. त्यामुळे ठाकरे सरकार पायउतार होईल व राष्ट्रपती राजवट लागू होईल. त्यानंतर मध्यावधी निवडणुका होऊ शकतात.
विधानसभेचे सध्याचे संख्याबळ काय?
शिवसेना 55 राष्ट्रवादी 53 काँग्रेस 44 भाजप 106 मनसे 01 एमआयएम 02 प्रहार जनशक्ती 02 अपक्ष 13 शेकाप 01 सपा 02 माकप 01 बविआ 03 स्वाभिमानी 01 इतर 03
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App