गर्भलिंगनिदान व गर्भपात केल्याचे खोटे आरोप करून खोटे साक्षीदार, व्हिडीओ क्लिप व पुरावे गोळा करून गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन ३० लाखाची खंडणी मागणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे -गर्भलिंगनिदान व गर्भपात केल्याचे खोटे आरोप करून खोटे साक्षीदार, व्हिडीओ क्लिप व पुरावे गोळा करून गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन ३० लाखाची खंडणी मागणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी उरुळी कांचन हद्दीतील पांढरस्थळ येथून रंगेहाथ पकडले आहे. मंगेश माणिक कांचन ( वय-३५, रा. पांढरस्थळ, उरुळीकांचन, ता. हवेली,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सदर डॉक्टरांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. The criminal issued a threat saying that he will file fake and fabricated Sex determination case against the doctor if ३० lakhs money not paid to him
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलीस अधिकारी व पोलीस अंगलदार यांना आदेश दिले आहेत.
उरुळी कांचन येथील तक्रारदार व त्यांचे डॉक्टर मित्र मिळुन गर्भलिंग निदान व गर्भपात करीत आहेत. यासाठी खोटे साक्षीदार उभे करू व त्याबाबत माझ्याकडे व्हिडीओ क्लिप असुन ती मी पोलीसाकडे देवून तुम्हाला गुन्ह्यात अडकवितो. अशी धमकी देवुन त्यांचेकडे ५० लाख रुपयाची खंडणीची मागणी आरोपी मंगेश कांचन याने केली अशी तक्रार तक्रारदार डॉक्टरांनी दिली आहे.
तसेच तक्रारदार यांना उरुळी कांचन येथे प्रत्यक्ष आरोपी व त्यांचा एक अनोळखी साथीदार असे भेटुन तक्रारदार यांना बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्यांच्याकडे ३० लाख रुपयाची खंडणीची मागणी केली होती. लोणी काळभोर पोलिसांनी सापळा रचून आरोपी मंगेश कांचन याला त्याच्या राहत्या घरी जावुन सदरची खंडणीची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले.
आरोपी मंगेश कांचन याच्यावर यवत, पौड़, लोणीकंद, ओतुर विमानतळ, हिंजवडी पोलीस ठाणे येथे खुन, खंडणी, दरोडयाचा प्रयत्न, जबरी चोरी, अपहरण, बलात्कार आदी बाबत १२ गुन्हे दाखल आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ०५ दिवस पोलीस कस्टडीची दिली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक किरण धायगुडे करीत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App