ठाकरे – पवार सरकारच्या पोलिसांनी पुण्यात एल्गार परिषदेला परवानगी नाकारली

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगावलाही गर्दी न करण्याचे आवाहन

वृत्तसंस्था

पुणे : ठाकरे – पवारांच्या राज्यात पुणे पोलिसांनी ३१ डिसेंबरला होणाऱ्या एल्गार परिषदेला नाकारली आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ही परिषद होणार नाही असे वाटत असताना होतं. ही परिषद होईल असे जाहीर करून संयोजकांनी पुणे पोलिसांकडे परवानगीही मागितली होती. मात्र, पुणे पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. thackeray – pawar govt rejects application to hold elgar parishad in pune on 31st december

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी १ जानेवारीला देशभरातले आंबेडकरी अनुयायी येत असतात. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबरला पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होते. मात्र या परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. एएनआयने या संदर्भातली बातमी दिली आहे. thackeray – pawar govt rejects application to hold elgar parishad in pune on 31st december

एल्गार परिषदेला संमती देऊ नये म्हणून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अर्ज केले होते. तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम बंदिस्त ठिकाणी घेण्यासाठी संमती द्यावी अशी मागणी केली होती. मात्र पुणे पोलिसांनी या परिषदेला परवानगी नाकारली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या एल्गार परिषदेशी संबंधित काही विचारवंत आणि दिग्गजांवर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास NIA देण्यात आला आहे.

thackeray – pawar govt rejects application to hold elgar parishad in pune on 31st december

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारीला कोरेगाव-भीमा परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन ठाकरे – पवार सरकारने केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे १ जानेवारी रोजीही दूरदर्शन आणि सोशल मीडियावरून येथे होणाऱ्या कार्यक्रमाचं प्रसारण सुरू राहणार आहे. मात्र कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ परिसरात कोणत्याही राजकीय सभा घेऊ नयेत किंवा पुस्तकांचे स्टॉल्स लावू नयेत असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub