वृत्तसंस्था
हैदराबाद – तेलंगणात “लेडी राज ठाकरे” यांचा उदय झाला आहे. वायएसआर राजशेखर रेड्डी यांच्या कन्या वाय. एस. शर्मिलांच्या YSRTP पक्षाला स्थापनेलाच मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसले आहे. पक्ष स्थापनेसाठी त्यांनी वायएसआर जयंतीचा मुहूर्त निवडला आहे. Telangana CM Jaganmohan Reddy’s sister YS Sharmila launches her party ‘YSR Telangana Party’ on the occasion of her late father YS Rajasekhara Reddy’s birth anniversary.
वाय. एस. शर्मिला या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर राजशेखर रेड्डी यांच्या कन्या आणि सध्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी आहेत. त्यांनी जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसची शाखा तेलंगणात खोलण्यापेक्षा आपला वेगळा पक्ष काढणे पसंत केले आहे. वाय. एस. शर्मिला यांनी आपल्या पक्षाचे नाव वायएसआर तेलंगणा पार्टी असे ठेवले आहे.
समाज कल्याण, आत्मनिर्भरता आणि समानता या तीन तत्त्वांवर YSRTP अर्थात वायएसआर तेलंगणा पार्टी चालेल, असे स्पष्ट केले आहे. हैदराबादमध्ये पक्ष स्थापनेच्या कार्यक्रमाला निमंत्रितांनी चांगली गर्दी केली होती.
वाय. एस. शर्मिला यांचा पहिला मेळावा राज ठाकरे यांच्या मनसे स्थापनेसारखाच दिसला. आज हैदराबादेत रमजान किंवा दसऱ्यासारखा उत्साह होता. तेलंगणाच्या केसीआर सरकारने विविध योजनांच्या घोषणा तर बड्या बड्या केल्या पण त्यातली एकही योजना यशस्वी ठरलेली नाही, अशी टीका वाय. एस. शर्मिला यांनी केली. तेलंगणात केसीआर अर्थात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या परिवाराखेरीज कोणीही खूश नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
मुख्यमंत्री केसीआर हे खोटारडे आहेत. त्यांनी सत्तेवर येताना जी आश्वासने दिली होती, त्यातले एकही आश्वासन त्यांनी पाळले नसल्याची टीका YSRTP चे प्रवक्ते सय्यद मुस्तफा अहमद यांनी केली.
Andhra Pradesh Chief Minister Jaganmohan Reddy's sister YS Sharmila launches her party 'YSR Telangana Party' on the occasion of her late father YS Rajasekhara Reddy's birth anniversary. pic.twitter.com/xdr5GjUSqw — ANI (@ANI) July 8, 2021
Andhra Pradesh Chief Minister Jaganmohan Reddy's sister YS Sharmila launches her party 'YSR Telangana Party' on the occasion of her late father YS Rajasekhara Reddy's birth anniversary. pic.twitter.com/xdr5GjUSqw
— ANI (@ANI) July 8, 2021
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App