Tamil Nadu The Focus India Exit Poll Results 2021: तामिळनाडूत कोण होणार मुख्यमंत्री? पहा एक्झिट पोल


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये तामिळनाडूच्या निवडणुकीकडेही देशाचं लक्ष लागून आहे. तामिळनाडूचा निकाल काय असणार याकडे तामिळनाडूसह देशाचं लक्ष लागलं आहे. तामिळनाडूमध्ये  234 जागांसाठी एकाच टप्प्यात सहा एप्रिलला मतदान पार पडलं.राज्यात एकूण 71.43 टक्के मतदानाची नोंद झाली.  234 जागा असलेल्या तामिळनाडू विधानसभेत सत्ता काबिज करण्यासाठी  एआयएडीएमके, डीएमके आणि भाजपमध्ये मुख्य लढत होती. Tamil Nadu The Focus India Exit Poll Results 2021

2016 मध्ये

2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत एआयएडीएमकेनं जयललिता यांच्या नेतृत्वात विजय मिळवला होता. मात्र 5  डिसेंबर 2016 रोजी जयललिता यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर ओ पनीरसेल्वम तामिलनाडुचे मुख्यमंत्री झाले. मात्र  73 दिवसानंतर त्यांना खुर्ची सोडावी लागली.  16 डिसेंबर 2017 रोजी ई पलानीस्वामी राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याच नेतृत्वात 2021 च्या निवडणुका लढल्या गेल्या.

तामिळनाडुमधील प्रमुख लढती

इडप्पाडी, सेलम जिल्हा = पलानीस्वामी, अन्नाद्रमुक (मुख्यमंत्री) – टी संपत कुमार, डीएमके युवा नेता

बोडिनायाकन्नूर = ओ पन्नीरसेल्वम, एआईडीएमके (उपमुख्यमंत्री) – थंगा तमिलसेल्वन, डीएमतके

थाउसंड लाइट्स = खुशबू सुंदर (अभिनेत्री), बीजेपी – एन. एझिहन , डीएमके

कोलाथुर = एमके स्टालिन, डीएमके प्रमुख, – अधिराजराम , एआईडीएमके – ए जगदीश, एमएनएम

चेपॉक विधानसभा = डीएमके प्रमुख एमके स्टालिन के बेटे उदयनिधि – ए. कसाली , पीएमके

कोविलपट्टी = दिनाकरन, शशिकला यांचा भाचा – अन्नाद्रमुक के उम्मीदवार के राजू – डीएमके गठबंधन के श्रीनिवासन

कोईंबत्तूर दक्षिण = कमल हासन, मक्कल निधी मय्यम – वनाथी श्रीनिवासन, बीजेपी

सध्या काय?

राज्यात एआयडीएमकेची सत्ता आहे. पलानीस्वामी हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. गेल्या निवडणुकीत एमआयएडीएमकेच्या आघाडीने 134 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी डीएमके दुसऱ्या क्रमांकावर गेली होती. डीएमकेला 98 जागा मिळाल्या होत्या.

Tamil Nadu The Focus India Exit Poll Results 2021

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती