सुशील कुमार शिंदे यांची सुद्धा स्वबळाची भाषा ; नाना पटोले यांच्या सुरात सूर

विशेष प्रतिनिधी

पुणे : शरद पवार हे गुगली टाकण्यात एक्सपर्ट आहेत. आजच्या मोदी – पवार भेटीचा वेगळा अर्थ लावण्याची काही गरज नाही, महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दिली असून पटोले यांच्या स्वबळाच्या सुरात सूर मिसळला आहे. Sushil Kumar Shinde’s own language

शिंदे म्हणाले, नाना पटोले यांची स्वबळाची भाषा योग्यच आहे, आम्हालाही आमचा काँग्रेस पक्ष पुन्हा खंबीर करायचाय. त्यामुळे जवळ आहे तोवर जवळ नाही तेव्हा बघू पुढं काय करायचं ते…

केंद्राकडून ईडी, सीबीआयचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रात नव सहकार खातं निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील सहकार चळवळीला कोणताही धोका पोचणार नाही, ही चळवळ भक्कम पायावर उभी आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Sushil Kumar Shinde’s own language

  • सुशील कुमार शिंदे यांची सुद्धा स्वबळाची भाषा
  • नाना पटोले यांच्या सुरात सूर मिसळला
  •  शरद पवार हे गुगली टाकण्यात एक्सपर्ट
  •  मोदी- पवार भेटीचा वेगळा अर्थ काढू नका
  •  महाविकास आघाडी भक्कम असल्याचा दावा
  •  तोवर जवळ नाही तेव्हा बघू पुढं काय करायचं ते
  • ईडी, सीबीआयचा गैरवापर होत असल्याचा आरोप
  • सहकार चळवळीला धोका नसल्याचा दावा