दिल्लीमध्ये लंगोटी तर; मुंबईत आक्रोश आंदोलन; विमानतळाच्या नामकरणाचा वाद


विशेष प्रतिनिधी

मुंबई : नवी मुंबई विमानतळाला दि. बा.पाटील यांचे नाव दिले नाही तर दिल्लीत लंगोटी आंदोलन छेडत आणि मुख्यमंत्र्याच्या घरासमोर आक्रोश आंदोलन करणार आहे, असा गंभीर इशारा पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी दिला. मुख्यमंत्र्याना घराबाहेर पडू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. If diapers in Delhi;Outrage movement in Mumbai

दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समर्थन समितीतर्फे डोंबिवली येथील प्रगती महाविद्यालयाच्या सभागृहात विमानतळ नामकरण परीषदेचे आयोजित केली होती. यावेळी पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी अनेक दिवस नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जावे, अशी मागणी आगरी समाजाकडून केली जात असून या मागणीला इतर समाजाने आणि अनेक राजकीय पक्षांनी पाठींबा दिला आहे.

मात्र, विमानतळाला स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. यामुळेच १५ दिवसापूर्वी आगरी समाजाबरोबरच इतर समाज तसेच विविध पक्ष मिळून नवी मुंबई येथील सिडको येथे मोठे आंदोलन केले होते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर करणाऱ्या सिडको प्रशासनाचा तीव्र शब्दात त्यांनी निषेध केला. गायकवाड म्हणाले, महाराष्ट्रात १९ मुख्यमंत्री होऊन गेले.

परंतु एकाही मुख्यमंत्र्यांनी कुटुंबातील सदस्यांचे नाव कोणत्याही प्रकल्पाला दिले नाही. मात्र उद्धव ठाकरे हे एकमेव मुख्यमंत्री जे वडिलांचे नाव देण्यासाठी झटत आहेत. स्वतः बाळासाहेब आज जिवंत असते तरीही त्यांनी दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यासाठी आग्रह धरला असता. आपल्या या मागणीसाठी २९ जुलैपूर्वी पारंपरिक वेशात दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत हवाईअड्डामंत्र्याची भेट घेणार आहोत. तरीही हा प्रश्न मार्गी न लागल्यास दिल्लीत अर्धनग्न (लंगोटी) आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तिथे न्याय मिळाला नाही आणि त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय बदलला नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर घेराव घालत त्यांना घराबाहेर पडू देणार नाही असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे.यावेळी भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील, राष्ट्रवादीचे अर्जूनबुवा चौधरी, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, काँग्रेसचे संतोष केणी , कॉम्रेड कृष्णा भोयर, रवी भिलाने लाल बावटा युनियनचे अध्यक्ष काळू कोमस्कर आदि मान्यवर उपस्थित होते.

If diapers in Delhi;Outrage movement in Mumbai

  • नवी मुंबई विमानतळाला दि. बा.पाटील यांचे नाव देण्याची मागणी
  •  बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा सरकारचा प्रस्ताव
  •  सिडको प्रशासनाच्या प्रस्तावाचाही तीव्र निषेध
  •  मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही.
  •  मुंबई येथील सिडको येथे मोठे आंदोलन केले
  •  दिल्लीत लंगोटी आंदोलनाचा दिला इशारा
  •  विमानतळ नामकरणाचा वाद पेटणार

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात