अश्रूंच्या ओव्हर ड्राफ्टचा राजकीय डिव्हीडंड मिळून मिळून मिळणार तरी किती??


अश्रूंच्या ओव्हर ड्राफ्टचा राजकीय डिव्हीडंट मिळून मिळून मिळणार तरी किती??, असा विचार करायची वेळ मराठी माध्यमांनी आणली आहे. खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यात अजितदादा आणि त्यांचा स्वतःचा व्हिडिओ पाहून अश्रू आले. त्या अश्रूंची व्हिडिओ क्लिप गेला आठवडाभर सर्व माध्यमांनी एवढ्या वेळा दाखवली, की नेमका तोच अश्रूंचा ओव्हर ड्राफ्ट झाला आणि त्याच ओव्हर ड्राफ्टवर शरदनिष्ठ राष्ट्रवादीला राजकीय डिव्हीडंट मिळणे अपेक्षित आहे. मूळात ओवर ड्राफ्टवर कोणताही डिव्हीडंट मिळत नसतो हा आर्थिक नियम आहे. पण इथे राजकीय डिव्हीडंडचा मुद्दा आहे, त्यामुळे तो अपेक्षित धरला आहे.Supriya sule weeps in avdhut gupte’s program, but will NCP get its political mileage??

इथे ते अश्रू खरे की खोटे किंवा राजकीय की अराजकीय हा चर्चेचा मुद्दाच नाही. मूळ प्रश्न हा आहे, की त्या अश्रूंची शरदनिष्ठ राष्ट्रवादीला अपेक्षित असणारी राजकीय किंमत मिळणार का?? आणि त्याचे उत्तर आत्तापर्यंत सहानुभूतीची लाट या विषयाच्या ओसरत्या प्रभावातून मिळू शकते. सुप्रिया सुळे यांचे अश्रू खरे मानून चालले, तरी देखील मूळातच तो विषय माध्यमांनी आता एवढा चघळला आहे, की त्यातली मूळ गोडीच संपून गेली आहे. शिवाय खुपते तिथे गुप्तेचा सुप्रिया सुळे एपिसोड गणेशोत्सवाच्या घाईगर्दीत दाखविणार आहेत. त्यामुळे या संपूर्ण कार्यक्रमाला किती टीआरपी मिळतो, हाच यक्ष प्रश्न आहे. कारण संपूर्ण मुलाखत इंटरेस्टिंग वाटावी यासाठी जो टीजर रिलीज केला, त्याचा माध्यमांमध्ये अतिरेक झाला आहे आणि कुठलाही अतिरेक हा प्रतिकूल परिणाम देतो ही अनुभव सिद्ध गोष्ट आहे.मूळात शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस मराठी माध्यमांनी ओव्हर रेटेड रिपोर्टिंगमधून तिच्या मूळ राजकीय साईज पेक्षा फार मोठी दाखवून ठेवली आहे. त्यातच खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रतिमा निर्मितीचा भाग म्हणून त्यांच्या अश्रूंचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल करण्यात आला आहे. त्यातून त्यांची एक कनवाळू राजकीय नेता म्हणून प्रतिमा तयार होणे हे राष्ट्रवादीला अपेक्षित आहे, पण गेल्या काही वर्षांमधला सहानुभूतीच्या राजकीय भांडवलाच्या घसरत्या मूल्याकडे नीट पाहिले तर ते कितपत शक्य होईल??, या विषयी दाट शंका वाटते.

जनतेने भारतीय राजकारणात आत्तापर्यंत इंदिरा गांधी – राजीव गांधी यांच्या लाटा पाहिल्या. पण इंदिरा लाटेच्या वेळी तरुण राजीव गांधींचा करुण चेहरा जेवढा परिणामकारक ठरला, तेवढा परिणाम राजीव गांधी यांच्या लाटेचा झाला नव्हता, ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर तर भारतीय राजकारणात अशी कोणती लाटच आली नाही, की जिने संपूर्ण समाजमन व्यापून टाकले!!

अगदी 2014 च्या निवडणुकीत मोदी लाट असल्याचे बोलले गेले, पण त्या लाटेने देखील भाजपला केवळ पूर्ण बहुमतच दिले होते. त्यापलीकडे भाजपला तेव्हा तरी मोठे यश मिळाले नव्हते. अशी अनेक उदाहरणे आहेत. आता जिथे भाजप सारख्या बलाढ्य पक्षाला लाटेच्या भांडवलातून फारतर पूर्ण बहुमत दोनदा मिळू शकते. पण ते 3/4 किंवा 2/3 एवढे सुद्धा नसते, तिथे मूळातच ज्या पक्षाचा राजकीय जीव पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे, त्या पक्षाला अश्रूंच्या ओव्हर ड्राफ्टचा डिव्हीडंड मिळून मिळून मिळणार तरी किती??, हा खरा प्रश्न आहे.

आत्ताची पिढी अश्रूंचे बांध फुटून वाहिलेल्या असल्या भावनांकडे फारसे लक्ष देत नाही. त्यातही जर ते अश्रू एखाद्या राजकीय व्यक्तीचे असतील आणि त्यात विशिष्ट मर्यादेपर्यंत प्रामाणिक भावना जरी असेल, तरी त्याचे फारसे राजकीय भांडवल मूल्य जनता देतच नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचे खुपते तिथे गुप्ते मधले अश्रू खरे मानले, तरी त्याचे राजकीय मूल्य मिळालेच, तर ते फार मर्यादित स्वरूपाचे असेल, ही गत अनुभवावरून दिसत असलेली वस्तुस्थिती आहे!!

Supriya sule weeps in avdhut gupte’s program, but will NCP get its political mileage??

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात