Supriya sule : शिंदे सें बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही, सुप्रिया सुळेंचा नवा नारा; हा तर महाविकास आघाडीतून ठाकरेंना डच्चू देण्याचा इशारा!!

Supriya sule

नाशिक : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे शरद पवारांनी स्वतःच्या हातात घेऊन दक्षिण महाराष्ट्रात राजकीय मुशाफिरी केली असली तरी खासदार सुप्रिया सुळे( Supriya sule ) यांनी परस्पर ती सूत्रे आपल्या हातात घेऊन, “एकनाथ शिंदेसें बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही”, असा नवा नारा दिला. त्याचवेळी त्यांनी मनोज जरांगेंवर टीका करू नका, असे आदेश राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना दिले, पण या सगळ्या राजकीय घडामोडीत सुप्रिया सुळे यांनी परस्पर उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर काढण्याचा इशारा देऊन टाकला.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी दोनदा भेट घेतली. त्याचवेळी पवारांनी एकनाथ शिंदेंवर नवी “राजकीय लाईन” मारायला सुरुवात केल्याचे चित्र निर्माण झालेच होते. प्रत्यक्षात पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी उघडपणे तसे दर्शविले नसले, तरी प्रत्यक्षात एकनाथ शिंदेंचे विशिष्ट महत्त्व वाढवून पवारांनी विधानसभा निवडणुकीचे नंतरच्या समीकरणांना हवा देऊन ठेवली होती. भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून त्यांची महत्त्वाकांक्षा वाढवून ठेवल्यानंतर त्या वाढलेल्या महत्त्वाकांक्षेचा “लाभ” घेण्याचा पवारांनी अप्रत्यक्ष इरादा दाखवून दिला होता.



आता त्या पलीकडे जाऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर “डायरेक्ट राजकीय लाईन” मारली. एकनाथ शिंदे यांच्याशी वैर नाही, पण देवेंद्र फडणवीस यांची खैर नाही, अशी उघडपणे जातीय लाईन घ्यायला सुप्रिया सुळे यांनी प्रवक्त्यांना उद्युक्त केले.

गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे हे शिंदे – फडणवीस सरकार मधल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोडून देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच मागे हात धुवून लागले आहेत. मराठा आरक्षणापासून ते एसटी कर्मचाऱ्यांच्या संप पर्यंत महाराष्ट्रातल्या कुठलाही मुद्दा फडणवीस यांना नेऊन भिडवण्याचा नादी ते लागल्याचे दिसत आहेत.

कालच मनोज जरांगे यांच्याशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी मध्यरात्री चर्चा केली होती. त्यावेळी मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांचे देखील फोनवर बोलणे झाल्याची माहिती सत्तार आणि जरंगे यांनी दिली आपण देवेंद्र फडणवीस यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवर कसे सुनावले, याची तपशीलवार माहिती जरांगे यांनी दिली. परंतु स्वतः फडणवीसांनी मात्र त्यावर कुठलेही भाष्य केल्याची बातमी समोर आली नाही.

या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी थेट मनोज जरांगे यांच्याच तोंडची भाषा स्वतः वापरून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना एकनाथ शिंदे यांच्या विषयी “सॉफ्ट” राहा, पण फडणवीसंना सोडू नका, अशी जातीय लाईन घेण्याचे आदेश देऊन टाकले. यातून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर “राजकीय लाईन” मारलीच, पण त्याच वेळी जर एकनाथ शिंदे निवडणुकीनंतरच्या पवारांच्या समीकरणात बसणार असतील, तर अर्थातच उद्धव ठाकरे हे समीकरणाच्या कंसाबाहेर जातील, अशी व्यवस्था परस्पर करून तसा इशाराच सुप्रिया सुळे यांनी आपल्या वक्तव्यातून देऊन टाकला.

सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या जातीय लाईनवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकी कोणती आणि कशी भूमिका घेणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Supriya sule targets devendra fadnavis only

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात