वृत्तसंस्था
कोलकाता : महत्त्वाकांक्षी सुजाता सौमित्र खानने भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यांचे खासदार पती सौमित्र खान यांनी घटस्फोटाची नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला. पश्चिम बंगालमध्ये आज पती-पत्नींमधले राजकीय घटस्फोट नाट्य रंगले. sujata khan joins mamata party
विष्षुपूरचे भाजप खासदार आणि युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सौमित्र खान यांची पत्नी सुजाता खानने भाजपला संधीसाधू पक्ष म्हणत सोडचिठ्ठी देऊन तृणमूळ काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. तृणणूळलला देखील बऱ्याच पडझडीनंतर एक नाव असलेला चेहरा पक्षाला येऊन मिळाल्याचा आनंद झाला. sujata khan joins mamata party
पण हा आनंद फार टिकू शकला नाही. इकडे सुजाता खान भाजपचे कमळ सोडून तृणमूळचा झेंडा हातात घेत होत्या. तिकडे सौमित्र खान पत्रकार परिषद घेत होते. सुजाताने भाजप सोडल्याचे कळताच त्यांना पत्रकार परिषदेतच रडू कोसळले. त्यांनी भावनावेगात सुजाता यांना घटस्फोटाची नोटीस पाठविण्याचे जाहीर केले. आता तू तुझ्या नावापुढचे खान नाव काढून टाक. माझे नाव इथून पुढे वापरू नकोस. तू आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक करते आहेस, असे सुनावले.
भाजपखेरीज मी स्वतःला काहीच समजत नाही. तिने माझा प्रचार केला हे खरे आहे. पण भाजपचा झेंडा नसता तर मी निवडून आलो नसतो. तृणमूळने तिच्या घराची वीज तोडली. नोकरीत अडथळे आणले. तिला वेगवेगळ्या प्रकारे छळले. हे ती विसरली आणि तिकडे गेली. घरापेक्षा तिने राजकारणात स्वतःची महत्त्वाकांक्षा मोठी मानली. हरकत नाही. आता तिने माझे खान नाव वापरू नये. मी तिला घटस्फोट देणार आहे, असे सौमित्र खान यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App