शिकारीच्या वेळीआपल्याच मित्राला गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याच्या अपराधीपणाच्या भावनेतून तीन तरुणांनी विष खाऊन आत्महत्या केली. उत्तराखंडमधील टेहरी जिल्ह्यता हा धक्कादायक प्रकार घडला. हे चारही तरुण १८ ते २२ वयोगटातील होते.Suicide of three youths due to guilt of accidentally shooting a friend while hunting
विशेष प्रतिनिधी
टेहरी : शिकारीच्या वेळीआपल्याच मित्राला गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याच्या अपराधीपणाच्या भावनेतून तीन तरुणांनी विष खाऊन आत्महत्या केली. उत्तराखंडमधील टेहरी जिल्ह्यता हा धक्कादायक प्रकार घडला. हे चारही तरुण १८ ते २२ वयोगटातील होते.
टेहरी जिल्ह्यातील भिलांगना गावातील जंगलात सात तरुणांचा गट शिकारीसाठी गेला होता. राजीव नावाचा २२ वर्षांचा तरुण त्यांचे नेतृत्व करत होता. त्याच्या खांद्यावर पूर्ण भरलेली बंदूक होती.
पूर्ण लोडेड असलेली बंदूक त्याच्या खांद्यावर निसटून गोळी सुटली. त्याच्या मागोमागच चाललेल्या संतोष नावाच्या तरुणाला गोळी लागली. वर्मी गोळी लागल्याने संतोष खाली पडला. अति रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाला.
हा प्रकार झाल्यावर राजीव बंदूक घेऊन पळून गेला. मात्र, या ग्रुपमधील सोबन, पंकज आणि अर्जून या तरुणांना अपराधी वाटत होते. आपल्यामुळेच संतोषचा मृत्यू झाला या अपराधीपणातून त्यांनी किटकनाशक पिऊन आत्महत्या केली.
त्यानंतर त्यांच्या दोन मित्रांनी गावात जाऊन या घटनेची माहिती दिली. ग्रामस्थांनी तातडीने या तिघांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App