धर्मापेक्षा माणसुकी श्रेष्ठ : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यावेळी शीख जवानाने पगडी काढून बांधल्या सहकाऱ्याच्या जखमा!


पगडी म्हणजे शिख धर्मीयांसाठी मानाचे चिन्ह. कितीही संकट आले तरी शिख पगडी काढत नाही. परंतु, धार्मिक विश्वसावर कधीकधी माणुसकी विजय मिळविते. छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या हल्यात जखमी झालेल्या आपल्या सहकाऱ्याला वाचविण्यासाठी एका शिख जवानाने आपली पगडी काढून त्याच्या जखमा बांधल्या.Humanity superior to Dharma, Sikh soldier removes turban and ties the wounds of a colleague


विशेष प्रतिनिधी 

जगदलपूर : पगडी म्हणजे शिख धर्मीयांसाठी मानाचे चिन्ह. कितीही संकट आले तरी शिख पगडी काढत नाही. परंतु, धार्मिक विश्वसावर कधीकधी माणुसकी विजय मिळविते. छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या हल्यात जखमी झालेल्या आपल्या सहकाऱ्याला वाचविण्यासाठी एका शिख जवानाने आपली पगडी काढून त्याच्या जखमा बांधल्या.

छत्तीसगडमधील बिजापूरजवळील जंगलात नक्षलवाद्यांशी केलेल्या हल्यात २२ जवानांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जवानांनी शौर्याची पराकाष्टा केली. त्याचबरोबर या संकटाच्या काळात माणुसकीची अनेक उदाहरणेही समोर आली.



आयपीएस अधिकारी आर. के. वीज यांनी दिलेल्या माहितीनुसार एका शिख जवानाने आपल्या सहकाऱ्याला वाचविण्यासाठी पगडी काढून त्याच्या जखमांवर बांधली. वीज यांनी ट्विटरवरून या जवानाला सलाम केला आहे. सुदैवाने शिख जवान आणि त्याचा सहकारी दोघेही या हल्यातून वाचले आहेत.

केंद्रीय राखीव पोलीस दलातील सब इन्स्पेक्टर दीपक भारद्वाज यांनीही याच पध्दतीने आपल्या सहकाऱ्याना वाचवले. भारद्वाज यांच्या पथकाला नक्षलवाद्यांनी घेरून जोरदार गोळीबार सुरू केला.

भारद्वाज यांनी प्रसंगावधान बाळगून आपल्या अनुभवाचा वापर करत साथीदार जवानांचा घेरा करुन नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. याच दरम्यान झालेल्या आयईडी बॉम्बचा स्फोट झाला आणि त्यांना प्राण गमावावे लागले.

Humanity superior to Dharma, Sikh soldier removes turban and ties the wounds of a colleague

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात