वृत्तसंस्था
मुंबई : बारामती, सांगली, सातारा आणि अहमदनगरमध्ये पुढील 7 दिवस अधिक कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि बाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. strict lockdown baramati satara sangli ahmednagar for week
मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व दुकाने, अस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
बारामतीमध्ये बुधवारपासून (ता. ५ मे ) हा लॉकडाऊन लागू होणार आहे. कोरोना नियमांचे नागरिक पालन करत नसल्याने जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होते. अजित पवारांनी घेतलेल्या आढावा बैठकीत वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर चिंता व्यक्त केली होती. तसेच कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला होता.
बारामतीमध्ये सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत दूध विक्रीसाठी परवानगी आहे. तसेच मेडिकल आणि दवाखाने सोडून सर्व दुकाने आणि अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश आहेत. बाजारही या 7 दिवसांमध्ये बंद ठेवण्यात येणार आहेत. सांगलीमध्ये मेडिकल, दूध विक्रीवगळता इतर सर्व सेवा बंद ठेवल्या तर सकाळी 11 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी आहे. जिल्ह्यात दररोज 20 रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App