
Stock Market : सोमवारी आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी देशांतर्गत शेअर बाजार नवीन विक्रमी उच्चांकावर बंद झाले. ऑटो, बँक, मेटल, पॉवर आणि रिअल्टी शेअर्समध्ये खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्स सोमवारी 76.72 अंकांनी वाढून 60,135.78 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी प्रथमच 17,900 च्या वर बंद झाला. निफ्टी 50.80 अंकांनी उसळी मारून 17,946 च्या पातळीवर बंद झाला. निफ्टीने इंट्रा डेमध्ये 18000 ची पातळी गाठली. Stock Market Sensex and Nifty closing at fresh record led by auto and power stocks
प्रतिनिधी
मुंबई : सोमवारी आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी देशांतर्गत शेअर बाजार नवीन विक्रमी उच्चांकावर बंद झाले. ऑटो, बँक, मेटल, पॉवर आणि रिअल्टी शेअर्समध्ये खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्स सोमवारी 76.72 अंकांनी वाढून 60,135.78 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी प्रथमच 17,900 च्या वर बंद झाला. निफ्टी 50.80 अंकांनी उसळी मारून 17,946 च्या पातळीवर बंद झाला. निफ्टीने इंट्रा डेमध्ये 18000 ची पातळी गाठली.
आजच्या व्यवसायात बाजाराला चौफेर खरेदीचा आधार मिळाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 20 समभाग वाढीसह बंद झाले, तर 50 पैकी 34 निफ्टी समभाग वाढले. इंट्रा डेमध्ये सेन्सेक्सने आज 60,476.13 च्या नवीन विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही तेजी
सोमवारच्या व्यवहारात मोठ्या समभागांबरोबरच मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागातही वाढ झाली. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.55 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्याच वेळी, बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 0.60 टक्के वाढला.
सरकारला दोन कंपन्यांकडून लाभांश
सरकारला FY22 साठी दोन कंपन्यांकडून लाभांश मिळाला आहे. सरकारला एनटीपीसी आणि पॉवरग्रीडकडून लाभांश मिळाला. एनटीपीसीने 1560 कोटी रुपयांचा लाभांश आणि पॉवरग्रीडने 1,033 कोटी रुपये दिले.
Stock Market Sensex and Nifty closing at fresh record led by auto and power stocks
महत्त्वाच्या बातम्या
- मेहबूबांचे बेताल वक्तव्य : म्हणाल्या, जर एखादा सुरक्षा दलाच्या गोळीने मेला तर ठीक, पण दहशतवाद्याच्या गोळीने मेला तर चूक, ही कोणती व्यवस्था?
- इस्लामिक स्टेटचा क्रूरकर्मा दहशतवादी सामी जसीम इराकच्या ताब्यात, अमेरिकेने ठेवले होते 37 कोटी रुपयांचे बक्षीस
- ब्रिटिश वृत्तपत्राचा दावा : रशियन हेरांनी चोरला अस्ट्राझेनेका लसीचा फॉर्म्युला, त्यावरूनच तयार केली स्पूतनिक-व्ही !
- महाराष्ट्र बंद : ठाण्यात रिक्षाचालकांना मारहाण, बेस्ट बसेसची तोडफोड, मुंबई-सोलापूरमध्ये टायर जाळले… कुठे-कुठे लागलं गालबोट?
- Nobel Prize In Economics : अमेरिकेचे डेव्हिड कार्ड, जोशुआ डी अँग्रिस्ट आणि गिडो इम्बेन्स यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर