नाशिक : संसदेत अभिभाषण करताना राष्ट्रपती थकल्या. “पूअर लेडी” असे म्हणून सोनिया गांधींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केला. त्यावरून देशात मोठा गदारोळ उठला. काँग्रेस सोडून बाकीच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी सोनिया गांधींना त्याबद्दल धारेवर धरले. काँग्रेस पक्षाने राष्ट्रपतींच्या भाषणावर टीका करत सोनिया गांधींनी केलेल्या अपमानाच्या विषयावर स्वतंत्र प्रतिक्रिया देणे टाळले. राष्ट्रपती भवनातून देखील राष्ट्रपती थकल्या नसल्याचा स्पष्ट खुलासा केला गेला.Sonia Gandhi insulted president draupadi murmu spraks controversy
पण सोनिया गांधींनी राष्ट्रपती थकल्या. “पूअर लेडी” असे म्हणून राष्ट्रपतींचा अपमान केल्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधी त्यांनी नरेंद्र मोदींचा ते मुख्यमंत्री असताना “मौत के सौदागर” म्हणून अपमानच केला होता. त्याची राजकीय किंमत आजपर्यंत काँग्रेसला चुकवावी लागत आहे.
पण त्या पलीकडे जाऊन राष्ट्रपतींचा अपमान ही तर गांधी घराण्याची पहचान असेच म्हणावे लागण्याची स्थिती आहे. गांधी घराण्यातल्या सगळ्याच सर्वोच्च नेत्यांनी राष्ट्रपती नावाच्या पदाला कायम दुय्यम लेखले. किंबहुना इंदिरा गांधींच्या काळात तर राष्ट्रपती नावाचे पद आणि “रबर स्टॅम्प” हे एकमेकांना समानार्थी शब्द म्हणून गणले गेले होते. कारण इंदिरा गांधींनी राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांना झोपेतून उठवून त्यांची आणीबाणीच्या वटहुकमावर सही घेतली होती. त्यांनी देखील इंदिरा गांधींचा राजकीय रुतबा लक्षात घेऊन किंबहुना घाबरून तशी सही केली होती.
पंडित जवाहरलाल नेहरूंनी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी राष्ट्रपतींनी प्रोटोकॉल नुसार काय करावे आणि काय करू नये याचे निर्बंध लादायचा प्रयत्न केला होता, जो पंतप्रधान म्हणून त्यांच्या अधिकार कक्षेच्या बाहेर होता. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी राष्ट्रपतींनी जाऊ नये, असा आग्रह पंडित नेहरूंनी धरला होता. परंतु, त्यावेळचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद खमके निघाल्याने त्यांनी नेहरूंचे न ऐकता सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार समारंभाला हजेरी लावून सोमनाथाची पूजा केली होती.
राजीव गांधी आणि ग्यानी झैलसिंग असा पंतप्रधान विरुद्ध राष्ट्रपती हा वाद 1987 मध्ये गाजला होता. राजीव गांधींनी आणलेल्या माहिती आणि प्रसारण विधेयकाला विरोध करून झैलसिंग यांनी सही करायचे नाकारले होते. त्यानंतर यांनी झैलसिंग यांनी राजीव गांधींचे सरकार बरखास्त करायचा डाव आखला होता, अशा बातम्या सर्व तर प्रसिद्ध झाल्या होत्या, पण खुद्द राजीव गांधींच्या सरकारने पाशवी बहुमताच्या बळावर झैलसिंग यांच्या विरोधात महाभियोग चालवून हटवायचा डाव आखला होता, या बातम्या मात्र दडपल्या गेल्या होत्या.
गांधी घराण्यातल्या राज्यकर्त्यांनी राष्ट्रपतींना वेगवेगळ्या वेळी विरोध केल्याची अशी अनेक उदाहरणे देशाच्या राजकीय इतिहासात नमूद आहेत. त्यातच आज सोनिया गांधींनी राष्ट्रपतींच्या केलेल्या अपमानाची भर पडली आहे. यापेक्षा वेगळे काही घडलेले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App