विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : वीज गेल्याने जनरेटर लावून झोपल्याने संपूर्ण घर धुराने भरल्याने गुदमरून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. Six members of the same family were killed due to smoke of generator
चंद्रपूर जवळील दुर्गापूर येथे ही दुर्दैवी घटना घडली. वीज गेल्याने रात्री जनरेटर लावून हे कुटुंब झोपलं होतं. मात्र जनरेटरच्या धुरामुळे लष्करे कुटुंबातील चार मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला. चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर भागात लाईट गेली होती. त्यामुळे लष्करे कुटुंबाने घरातील जनरेटर लावला होता. रात्री जनरेटर तसाच लावून हे कुटुंब झोपी गेलं. मात्र जनरेटरच्या धुराने घर भरलं. या धुरामुळे झोपेतच सर्वजण गुदमरले आणि 7 पैकी 6 जणांचा मृत्यू झाला. लष्करे कुटुंब मजुरी करते.
सकाळी शेजारच्या लोकांना शंका आल्यावर घटना उघडकीस आली. सर्व मयत आणि एकमेव वाचलेल्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. रमेश लष्करे- 44, अजय लष्करे-20, लखन लष्करे 9, कृष्णा लष्करे आठ, माधुरी लष्करे 18, पूजा लष्करे 14 यांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. तर दासू लष्करे 40 हा एकमेव सदस्य यातून वाचला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App