coal production : यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत देशातील कॅप्टीव्ह अर्थात कोळसा कंपन्यांच्या मालकीच्या खाणींमधून सुमारे 50 दशलक्ष टन कोळसा उत्पादन झाले असून विद्यमान आर्थिक वर्षात (2021-22) ते 85 दशलक्ष टन पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या 62 दशलक्ष टन कोळसा उत्पादनापेक्षा या वर्षी कोळसा उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. Significant increase in coal production, production is expected to reach 120 million tons in the next financial year
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत देशातील कॅप्टीव्ह अर्थात कोळसा कंपन्यांच्या मालकीच्या खाणींमधून सुमारे 50 दशलक्ष टन कोळसा उत्पादन झाले असून विद्यमान आर्थिक वर्षात (2021-22) ते 85 दशलक्ष टन पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या 62 दशलक्ष टन कोळसा उत्पादनापेक्षा या वर्षी कोळसा उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.
कोळशाच्या देशांतर्गत वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, कोळशाचे उत्पादन आणखी वाढविण्यासाठी केंद्रीय कोळसा मंत्रालयाचे सचिव डॉ. अनिल कुमार जैन यांनी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नव्या कोळसा खाणींच्या विकासावर परिणाम करणाऱ्या पर्यावरण आणि वनेविषयक परवानग्यांशी संबंधित समस्यांचा आढावा घेतला.
आगामी आर्थिक वर्षापर्यंत (2022-23) देशातील कॅप्टीव्ह अर्थात कोळसा कंपन्यांच्या मालकीच्या खाणींमधून होणारे कोळसा उत्पादन 120 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या यशामुळे देशांतर्गत कोळसा उत्पादनात आत्मनिर्भर भारत घडविण्याची संकल्पना साकारण्यात मदत होईल.
काही महिन्यांपूर्वी अनेक राज्यांत कोळशाअभावी वीजसंकट निर्माण झाले होते. पावसामुळे कोळसा खाणींतून कोळसा काढण्यास अडचणी येत होत्या. परिणामी, अनेक राज्यांनी केंद्राकडे कोळसा पुरवठ्यावरून तक्रार केली होती. त्यावेळीही सरकारने कोळसा कमी पडू देणार नसल्याची ग्वाही राज्यांना दिली होती.
Significant increase in coal production, production is expected to reach 120 million tons in the next financial year
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App