सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काहीही न करणारे आणि शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारी नेतेमंडळीच आता शेतकऱ्यांचे नाव पुढे करून राष्ट्रपतींची भेट घ्यायला जात आहेत, अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे. Shivraj Singh Chouhan alleges
वृत्तसंस्था
भोपाळ : सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काहीही न करणारे आणि शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारी नेतेमंडळीच आता शेतकऱ्यांचे नाव पुढे करून राष्ट्रपतींची भेट घ्यायला जात आहेत, अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे. Shivraj Singh Chouhan alleges
मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. मोदी सरकारवर दबाव आणण्यासाठी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यासमवेत पाच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. Shivraj Singh Chouhan alleges
या मुद्द्यावरून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शरद पवार आणि इतर नेत्यांवर टीका केली आहे. ते म्हणाले, शेतकरी हा देव असतो. पंतप्रधान मोदी यांनी आणलेला कायदा हा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. हा कायदा क्रांती घडवू शकतो. पण राजकीय नेतेमंडळी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत.
प्रसिध्द लेख चेतन भगत यांनीही कृषि कायदा रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. भगत म्हणाले की, कोणताही कायदा परिपूर्ण नसतो. जर कृषी कायद्यांविरोधात भीती आहे तर त्यावर बसून, चर्चा करुन, बदल करुनच तोडगा निघू शकतो.
परंतू कायदा रद्द करण्याची मागणी म्हणजे भारतीय कृषी क्षेत्रासाठी एक पाऊल मागे गेल्यासारखं होईल. यामध्ये छोट्या उद्योगांतून बाहेर येत भांडवलशाहीची आणि मोठ्या सुधारणेची गरज आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App