SHIVJAYANTI: ‘छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध’! पंतप्रधान मोदींच शिवप्रेम… मराठीत संदेश …पोस्ट केला खास फोटो…


  • महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभरात साजरी होते. विदेशात असलेला मराठी माणूसही आपल्या राजाची जयंती धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरी करतो. SHIVJAYANTI: ‘We are determined to fulfill the dream of Chhatrapati Shivaji Maharaj’! Prime Minister Modi’s love for Shiv … message in Marathi … posted a special photo .
  • आज मध्यरात्रीपासून फटाक्यांची आतिषबाजी होत आहे, पाळणा गाऊन महाराजांच्या जन्माचे स्वागत केले जात आहे, मिठाई वाटली जात आहे. सोशल मीडिया शिवमय झाला आहे.
  • गल्लीपासून दिल्लीपर्यंत महाराजांना मानवंदना देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही फोटो शेअर करत शिवाजी महाराजांना अभिवादन केलंय.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्राचं अराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती साजरी होत आहे. अनेक ठिकाणी छत्रपती शिवरायांना वंदन केलं जातं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं आहे.त्यांनी तमाम भारतीयांना मराठीत एक संदेश देखील दिला आहे .SHIVJAYANTI: ‘We are determined to fulfill the dream of Chhatrapati Shivaji Maharaj’! Prime Minister Modi’s love for Shiv … message in Marathi … posted a special photo .

पंतप्रधानांनी छत्रपती शिवरायांना वंदन करतानाचा एक खास फोटो ट्विट केला आहे. छत्रपती शिवरायांचं कार्य हे कायम प्रेरणा देणारं आहे, मी त्यांना नमन करतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

काय म्हणाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी?

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे अतुलनीय नेतृत्व आणि समाजकल्याणासाठी त्यांनी केलेलं कार्य पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेरणा देत आहे. सत्य आणि न्यायाच्या मूल्यांसाठी उभे राहण्याच्या बाबतीत ते ठाम होते. त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सगळ्या ठिकाणी साजरी केली जाते आहे. महाराष्ट्रात अत्यंत उत्साहाचं वातवरण आहे. औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 61 फुटी पुतळ्याचं थाटात अनावरण करण्यात आलं. शुक्रवारी रात्री 12 वाजता म्हणजेच 19 फेब्रुवारी ही तारीख लागल्यानंतर हा सोहळा पार पडला.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी या पुतळ्याचं अनावरण केलं. औरंगाबादच्या क्रांती चौकात हातात भगवे झेंडे घेऊन असंख्य कार्यकर्ते जमले होते. औरंगाबादचा क्रांती चौक जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी क्रांतीचौक दुमदुमला होता. ढोलताशांचा गजर, आतशबाजी, लेझर शो अशा थाटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

SHIVJAYANTI: ‘We are determined to fulfill the dream of Chhatrapati Shivaji Maharaj’! Prime Minister Modi’s love for Shiv … message in Marathi … posted a special photo .

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात