विशेष प्रतिनिधी
मुंबई : वीजचोरीमुळे महावितरण कंपनी तोट्यात चालली आहे. त्यासाठी सामान्यांवर वीजचोरीची कारवाईही केली जाते. परंतु, आठ कोटी रुपयांची रोल्स राईस खरेदी करणारेही वीजचोरीत मागे नसल्याचे दिसून आले आहे. ३५ हजार रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी कल्याण येथील शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Shiv Sena leader who bought Rolls rice worth Rs 8 crore has been booked for stealing electricity worth Rs 35,000
काही दिवसांपूर्वीच उद्योजक असलेले शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी आठ कोटी रुपयांची रोल्स राईस खरेदी केल्याने चर्चेत आले होते. मात्र आता त्यांच्या वीजचोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. मार्च महिन्यात कल्याण पूर्व कोळसेवाडी येथील बांधकाम जागेवर गायकवाडने वीज चोरी केल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
त्यानंतर गायकवाड यांनी तीन महिन्यांनंतरही दंडाच्या रक्कमेसह बिल भरले नाही. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज चोरीच्या आरोपाखाली ३० जून २०२१ रोजी त्यांच्याविरूद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. महावितरणने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १२ जुलै रोजी गायकवाड यांनी ४९ हजार ८४० रुपये चुकते केले आहेत. त्यापैकी ३४ हजार ८४० वीजेच्या चोरीसाठी आणि १५ हजार रुपये हे ‘सेटलमेंट’ म्हणून भरण्यात आले.
महावितरणने त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप निराधार असल्याचा दावा गायकवाडांनी केला आहे. गायकवाड म्हणाले की, ते सरकारला कोट्यावधी रुपयांचा कर भरतात. त्याच्यावर घाईघाईने वीज चोरीसारखे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीजेची बिलही मी भरले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App