विधानसभा अध्यक्षपद आवाजी मतदानाने निवडणूक; अध्यक्ष नसताना नियम बदलणेच नियमबाह्य; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे – पवार सरकारला टोला


प्रतिनिधी

मुंबई – विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्यासाठी महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार नियमांमध्ये बदल करण्याचा मनसूबा आखतेय. पण विधानसभेच्या कामकाजाचे नियम बदलण्याचा अधिकार अध्यक्षांच्याच समितीला आहे. उपाध्यक्षांना तो अधिकार नाही. त्यामुळे त्यांचा तसा प्रयत्न असेल, तर तोच अवैध आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. MVA Thackeray – Pawar govt has no trust on their own MLAs, targets Devendra Fadanavis

मूळात महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारकडे जर स्पष्ट बहुमत आहे तर ते मतदान घेऊन विधानसभेचे अध्यक्ष निवडायला का घाबरत आहेत, असा सवाल फडणवीस यांनी केला. ते म्हणाले, याचा राजकीय अर्थ स्पष्ट आहे.



महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचा एकमेकांवर विश्वास नाही. समन्वय नाही. त्यांचा त्यांच्या आमदारांवर देखील विश्वास नाही म्हणून ते विधानसभेच्या कामकाजाचे नियम बदलण्याचा प्रयोग करणार असतील, तर तोच नियमबाह्य आहे. कारण विधानसभा अध्यक्षांच्याच अध्यक्षतेखाली असलेल्या नियम समितीला तसे नियम बदलण्याचा अधिकार आहे. उपाध्यक्षांना तो अधिकार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

-पंकजा मुंडे यांच्यावर माफक प्रतिक्रिया

पंकजा मुंडे यांचे भाषण आपण ऐकले का, असे पत्रकारांनी विचारल्यावर फडणवीस म्हणाले, की मी त्यांचे भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्याबाबत उत्तर दिलेले आहे. त्यावर मी काही बोलणे उचित नाही, एवढेच उत्तर फडणवीस यांनी दिले.

MVA Thackeray – Pawar govt has no trust on their own MLAs, targets Devendra Fadanavis

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात