मुंबईमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आता शिवसेनेबरोबर राहायचं आहे, त्याची सवय करून घ्या असा सल्ला देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॉंग्रेसला फोडण्यासाठी ताकद लावायला सुरूवात केली आहे. त्यामुळे भिवंडी- निजामपूर महापालिकेतील कॉंग्रेसचे १८ नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले. Shiv Sena, I want to break Congress, Ajit Pawar’s new move
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आता शिवसेनेबरोबर राहायचं आहे, त्याची सवय करून घ्या असा सल्ला देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॉंग्रेस फोडण्यासाठी ताकद लावायला सुरूवात केली आहे. त्यामुळे भिवंडी- निजामपूर महापालिकेतील कॉंग्रेसचे १८ नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले. Shiv Sena, I want to break Congress, Ajit Pawar’s new move
मुंबई आणि परिसरात राष्ट्रवादीची ताकद नाही. त्यामुळे शिवसेनेच्या खांद्यावर बसून आपली ताकद वाढवायची आणि कॉंग्रेसला कमकुवत करत राहायचे अशी अजित पवारांची नवी चाल असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला शिवसेनेने कितीही कमी जागा दिल्या तरी त्यांच्यासाठी फायदाच असेल.
मात्र, कॉंग्रेसची बरी ताकद असलेल्या भागातील नेते राष्ट्रवादीत घ्यायचे, अशी रणनिती आखली आहे. मुंबईमध्ये कॉंग्रेसकडे आता नेतृत्वच नाही. त्यामुळे याबाबत राजकीय चर्चा झाली नाही. महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी मात्र भिवंडी-निजामपूर नगरपालिकेच्या 18 काँग्रेस नगरसेवकांचा राष्ट्रवादीतील प्रवेश गंभीरपणे घेण्याचा सल्ला दिलाय. देशमुख यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना खुलं पत्र लिहून सावध होण्याचा इशारा दिलाय.
देशमुख म्हणाले की, हे प्रकरण सावध होण्यासारखं आहे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल. काँग्रेस पक्षाने केवळ महाराष्ट्र विकास आघाडीचा घटक होऊन आणि सरकारमध्ये मंत्रिपद घेऊन समाधानी व्हायला नको. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळालं आहे, पण काँग्रेस देखील आक्रमक आहे. राज्यात काँग्रेसचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नुकतेच आपल्या कार्यकर्त्यांना शिवसेनेसोबत समन्वय करण्यास सांगितले. त्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षात सहभागी करुन घेण्यात आलं. हा केवळ योगायोग नाही, असे देशमुख यांनी सांगितले.
याआधी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. मात्र, नंतर ते पुन्हा परतले. यानंतर मित्रपक्ष आपआपसात पक्षांतर करण्यावर नियंत्रण ठेवतील असं ठरलं होतं, तर मग काँग्रेसचे नगरसेवक राष्ट्रवादीत कसे गेले? असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र काँग्रेसच्या नेतृत्वाने समन्वय समितीतील आपल्या मित्रपक्षांकडे याबाबत उत्तर मागितलं पाहिजे. अन्यथा सत्ताधारी आघाडीत सर्वात जास्त नुकसान काँग्रेसचंच होईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App