शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी जानव्यात अडकलेले नाही, असे उध्दव ठाकरे हे वारंवार शिवसेनाप्रमुखांच्या हवाल्याने सांगतात. त्यावेळी ते मुद्दाम भाजपला आणि जुन्या जनसंघाला डिवचत असतात. हरकत नाही. राजकीय संताप किंवा सूडबुध्दी म्हणून ते असे करीत असतील, तरी देखील हरकत नाही. पण मग हिंदूंचे मुडदे पाडणाऱ्या ममतांची अफाट तरफदारी करून उध्दव ठाकरे हे शिवसेनेचे तरी असे कोणते हिंदुत्व जपत आहेत…??, नुसत्या भाषणबाजीचे आणि पोपटपंचीचेच ना…?? की दुसरे काही…?? shiv sena @55; uddhav thackeray`s hindutva making mockery of bengal hindus
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनी शिवसेनेला नवी हिंदुत्वाची व्याख्या करवून दिली आहे… शिवसेनेचे हिंदुत्व हे शेंडी जानव्यात अडकलेले हिंदुत्व नाही, तर ते आमचे राष्ट्रीयत्व आहे, असे उध्दव ठाकरे म्हणाले. पण ते तसे म्हणाले असले तरी शिवसेनेचे हिंदुत्व हे पोपटपंचीचे हिंदुत्व उरल्याचे त्यांनी आपल्या सगळ्या भाषणातून दाखवून दिले आहे.
त्यांनी आपल्या भाषणात पश्चिम बंगालचा उल्लेख करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची अशी काही अफाट स्तुती केली. की दस्तुरखुद्द ममतांच्या तृणमूळ काँग्रेसच्या लोकांनीही तोंडात बोटे घातली असतील. इंग्रजीत म्हण आहे, ना… loyal than the king himself… ही म्हण उध्दव ठाकरे यांनी सिध्द करून दाखविली.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा खऱ्या स्बवळावर जिंकल्यावर इकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आनंदाच्या घुगऱ्या खाल्या होत्या. तोच प्रकार उध्दव ठाकरे यांनी आज केला. पण हे करताना त्यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणूकीतल्या हिंसाचारात आणि निवडणूक निकालानंतरच्या हिंसाचारात मेलेल्या हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळले आहे. अर्थात हे त्यांना महाविकास आघाडीची पट्टी डोळ्यावर चढविल्यामुळे दिसले नसावे.
अन्यथा विजयाबद्दल ममतांची अफाट स्तुती करताना बंगालमधील हिंसाचारात हिंदूंचे रक्त सांडत असल्याबद्दल उध्दव ठाकरेंनी दोन शब्द तरी उच्चारले असते. किंवा ममतांना काही सल्ला दिला असता. पण नाही, कदाचित शिवसेनेची १९९२ च्या दंगलीतली पुण्याई आता सरली असावी. १९९२ च्या दंगलीत शिवसेना नसती, तर मुंबईत हिंदूंनी मार खाल्ला असता, याची आठवण उध्दव ठाकरे यांनी करून दिली. होय, खरेच आहे ते. जरूर त्या दंगलीत शिवसैनिकांनी हिंदूंच्या बाजूने लढा दिला होता. पण त्यामागे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा होती. बाळासाहेबांच्या डोळ्यावर महाविकास आघाडीची पट्टी बांधलेली नव्हती.
पण आज ज्यांच्या मांडीला मांडी लावून उध्दव ठाकरे हे सत्तेवर बसले आहेत ना, त्यावेळी महाराष्ट्रात त्यांचीच सत्ता होती. मुसलमानांना त्यांचीच फूस होती. बाळासाहेबांचे शिवसैनिक त्यांच्या विरोधात हिंदूंच्या बाजूने लढले होते. उध्दव ठाकरे हे विसरलेत काय…??
… आणि आजही ज्या प्रादेशिक अस्मितेच्या नावाने उध्दव ठाकरे हे ममता बॅनर्जींची अफाट स्तुती करीत आहेत, त्यांच्या राजवटीत बंगालमध्ये जागोजागी हिंदूंचे मुडदे पडत आहेत, ते हिंदू महाराष्ट्रातल्या मराठी हिंदूंपेक्षा वेगळे आहेत काय…?? मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे. हिंदू टिकला पाहिजे म्हणून शिवसेनेने लढा दिला हे खरेच आहे. पण आज बंगालमध्ये हिंदू मरतोय, त्यासाठी शिवसेनेचे हिंदुत्व जागे होत नाही का…?? की बंगाली हिंदू शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या कक्षेबाहेरील हिंदू आहेत…??
शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी जानव्यात अडकलेले नाही, असे उध्दव ठाकरे हे वारंवार शिवसेनाप्रमुखांच्या हवाल्याने सांगतात. त्यावेळी ते मुद्दाम भाजपला आणि जुन्या जनसंघाला डिवचत असतात. हरकत नाही. राजकीय संताप किंवा सूडबुध्दी म्हणून ते असे करीत असतील, तरी देखील हरकत नाही. पण मग हिंदूंचे मुडदे पाडणाऱ्या ममतांची अफाट तरफदारी करून उध्दव ठाकरे हे शिवसेनेचे तरी असे कोणते हिंदुत्व जपत आहेत…??, नुसत्या भाषणबाजीचे आणि पोपटपंचीचेच ना…?? की दुसरे काही…??
ममतांनी मोदी – शहांना हरविले म्हणून प्रादेशिक अस्मितेच्या नावाखाली ममतांची तरफदारी करायला हरकत नाही. पण त्यांच्या राज्यात हिंदू मरताहेत. त्याबद्दल उध्दव ठाकरे काही बोलणार आहेत की नाहीत, हा खरा प्रश्न आहे… की सिल्वर ओकच्या स्पर्शाने त्यांच्या हिंदुत्वाला विटाळले आहे…??
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App