शिवसेना @ 55; प्रादेशिक अस्मितेचा नारा जपत उध्दव ठाकरेंकडून ममतांवर अफाट स्तुतिसुमने


विशेष प्रतिनिधी

मुंबई – शिवसेनेच्या ५५ वर्धापन दिनी प्रादेशिक अस्मितेचा नारा जपत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.

शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ममतांनी बंगाल कसा जिंकला, स्वातंत्र्यपूर्व काळात वंदेमातरमचा नारा भारताला देणाऱ्या बंगालने क्रांतिकारक निर्माण केले. तसेच क्रांतिकारक ममता बॅनर्जींच्या रूपाने स्वातंत्र्यानंतरच्या काळातही बंगालने दिले, असे उध्दव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी जानव्यात अडकलेले नाही, असे सांगत उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व असल्याचा पुन्हा एकदा नारा दिला. पण ज्या स्वबळावर ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये सत्ता आणून दाखविली, त्या राजकीय स्वबळाची व्याख्या उध्दव ठाकरे यांनी बदलून टाकली. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा वापरली. त्यावर भाष्य करताना स्वबळ म्हणजे अन्यायाविरोधात लढताना मनगटात ताकद अशी व्याख्या करून त्यावर अधिक राजकीय भाष्य करणे टाळले.

उध्दव ठाकरे म्हणाले, की स्वबळाविषयी मी का सांगतोय तर जे अनेक जण सध्या स्वबळाचा नारा देत आहेत, त्यांना सांगायचेय की स्वबळ म्हणजे फक्त निवडणूक लढण्यापुरतेच नसते. न्याय्य हक्क मागण्यासाठी देखील स्वबळ लागते. नाहीतर अन्याय होतोय आणि अन्यायाविरुद्ध वार करायचाय पण बळच नाहीये आणि वार कसले करताय? आधी तलवार उचलण्याची ताकद कमवावी आणि मग वार करावा. स्वबळाचा अर्थ माझ्यासाठी तो आहे. निवडणुका येतात निवडणुका जातात. हारजीत होत असते. जिंकले तर आनंद आहे. पण हरल्यानंतरसुद्धा पराभूत मानसिकता घात करते, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात