पवार – ममता – सोनिया; याला म्हणतात काट्याने काटा…!!


पवार – ममता – सोनिया; याला म्हणतात काट्याने काटा…!! असेच आजचे राजकारण घडले आहे. मुंबईत ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस हायकमांडशी असलेले आपले जुने हिशेब अजून जणू चुकते करून घेतले आहेत…!!Sharad pawar played politics of revenge with congress through Mamata

घटना फार जुनी नाही… साधारण चार-पाच महिन्यांपूर्वीची आहे. त्यावेळी शिवसेनेचे खासदार प्रवक्ते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मध्येच एक राजकीय पिल्लू सोडून दिले होते. शरद पवार हे देशातले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना काँग्रेस नेतृत्वाने पुढाकार घेऊन संयुक्त पुरोगामी आघाडीचे अर्थात यूपीएचे अध्यक्ष करावे.

अशी सूचना त्यांनी सामनाच्या अग्रलेखांमधून आणि विविध वक्तव्यांमधून केली होती त्यावेळी महाराष्ट्रात देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होणार, अशा चर्चा जोरदार रंगल्या होत्या. या चर्चांना त्यावेळी फळ प्राप्त झाले नाही. त्या नुसत्या चर्चेच्या पातळीवर राहिल्या. महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी त्या चर्चेची खिल्ली उडविली होती.



पण आज मात्र त्याला काँग्रेसला अपेक्षित असे नव्हे, पण शरद पवार यांना अपेक्षित असे फळ उगवले आहे…!! ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांच्या भेटीत संयुक्त लोकशाही आघाडी अर्थात युपीए वगैरे काही अस्तित्वातच नाही, असे जाहीर करून एक प्रकारे शरद पवारांना हवा असलेला काँग्रेस हायकमांडवरचा राजकीय सूड उगवून घेतला आहे. वक्तव्य ममता बॅनर्जी यांच्या तोंडचे आहे!!… शरद पवार शेजारी उभे आहेत. ते सामूहिक नेतृत्वाची भाषा बोलताना दिसत आहेत…!! यातच सगळे चित्र स्पष्ट झाले आहे.

शरद पवार मनात म्हणत असतील, “बघा म्हणालो होतो ना… मला यूपीएचे अध्यक्ष करा. तुम्ही केले नाहीत. आता घ्या तुम्हाला पश्चिम बंगालमध्ये शून्यवत करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या तोंडूनच वदवून घेतो यूपीए वगैरे काही अस्तित्वातच नाही…!! म्हणजे यूपीए नावाचा राजकीय घटकच अस्तित्वात नाही…!!” यालाच म्हणतात…काट्याने काटा काढणे…!!

शरद पवार यांना काँग्रेस हायकमांडने

यूपीएचे अध्यक्ष केले नाही. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या मुखातून यूपीएचे राजकीय अस्तित्वच पुसून टाकले. याला पवारांचे राजकीय कर्तृत्व निश्चित म्हणता येईल. ममता बॅनर्जी यांच्या आजच्या महाराष्ट्र भेटीमधली ही खऱ्या अर्थाने फलश्रुती मानता येईल.

ममता बॅनर्जी या आत्तापर्यंत फक्त राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे नेतृत्व मानत नव्हत्या. परंतु यूपीए वगैरे काही अस्तित्वातच नाही, असे सांगून शरद पवार यांच्या हजेरीत त्यांनी थेट सोनिया गांधी यांच्या यूपीए अध्यक्षपदालाच मोडीत काढले आहे आणि इथेच पवारांच्या राजकीय खेळीची मेख आहे…!!

 पवारांना काँग्रेस शून्यवत करता येईल??

अर्थात ममतांच्या तोंडून पवारांनी यूपीएचे अस्तित्व संपवले असले तरी त्यांच्या समोरचे काँग्रेसचे आव्हान मात्र संपलेले नाही. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला शून्यवत केले तशी राजकीय किमया पवारांना महाराष्ट्रात जमलेली नाही. किंबहुना काँग्रेस पक्ष फार मर्यादित अर्थाने महाराष्ट्रात पवारांना पोखरता आलेला आहे. आणि अगदी 2019 च्या निवडणुकीचे विधानसभा निवडणुकीचे राजकीय चित्र जरी लक्षात घेतले तरी पवार आणि काँग्रेस यांच्यामध्ये फक्त १० चे अंतर आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस 54 आमदार आणि काँग्रेस 44 आमदार. याचा अर्थ पवारांचे राजकीय कर्तृत्व मतदान ममतांपर्यंत पोहोचायला अजून वेळ आहे. फक्त त्यांची ज्येष्ठता मात्र ममतांच्या पुढे खूपच अधिक आहे. ममतांनी त्यांना तो सन्मान दिलेला आहे. पण या सन्मानातून पवारांनी केंद्रीय पातळीवरचे जरी यूपीएचे अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना महाराष्ट्रातली काँग्रेस शून्यवत करता येईल का?? हे ठळक प्रश्नचिन्ह मात्र कायम आहे…!!.

Sharad pawar played politics of revenge with congress through Mamata

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात