अघोषित रिटायरमेंट : INDI आघाडी फुटल्यानंतरही शरद पवार “शांत”; संस्थात्मक कारभारात भाग घेऊन राजकारणापासून अलिप्त!!

Sharad Pawar

नाशिक : पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर तामिळनाडू मध्ये घडलेल्या राजकारणातून INDI आघाडी फुटली. काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन्ही पक्षांचे फाटले. द्रविड मुन्नेत्र कळघमने संसदे काँग्रेस पासून दूर बसण्याचे ठरविले. तसे पत्र सुद्धा लोकसभा अध्यक्षांना गेले.Sharad Pawar “calm” even after INDI alliance split; Stays away from politics by participating in institutional affairs!!

या पार्श्वभूमीवर शरद पवार मात्र शांत बसले, फक्त संस्थात्मक राजकारणात भाग घेऊन त्यांनी राष्ट्रीय आणि राज्याच्या राजकारणापासून अलिप्त राहणे पसंत केले.



– INDI आघाडी फुटली

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, पुदुचेरी आणि केरळ या पाच राज्यांच्या विधानसभांचे निकाल लागले. त्यामध्ये सर्वच राज्यांमध्ये मोठे उलटफेर झाले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हरल्या. तमिळनाडूमध्ये एम. के. स्टालिन हरले. केरळमध्ये कम्युनिस्टांचे सरकार हरले. पण तिथे काँग्रेसचे सरकार आले. तामिळनाडूमध्ये काँग्रेसने द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाबरोबरची युती तोडून थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिला‌. त्यामुळे विजयच्या पक्षाचे सरकार बनवण्याचा मार्ग मोकळा झाला. तामिळनाडूत फार मोठे राजकारण घडले. द्रविड मुन्नेत्र कळघम आणि काँग्रेस यांचे फाटले. INDI आघाडी तुटली.

– पण पवार “शांत”

पण शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते एवढ्या मोठ्या राजकीय घडामोडींच्या विषयी काहीही बोलले नाहीत. त्यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून किंवा अन्य सोशल मीडिया हँडल वरून निवडणुकांच्या संदर्भात आणि राज्यांच्या राजकारणासंदर्भात कुठलेही भाष्य केले नाही. त्यांनी कुठल्याच राज्यांमधल्या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देखील दिल्या नाहीत. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर ट्विट केली, पण ते राजकीय विषयांवर “शांत” राहिले.

पाच राज्यांचे राजकारण घडत असताना शरद पवारांनी‌ फक्त स्थानिक नेत्यांच्या भेटी घेतल्या, पण त्या राजकारणाच्या पलीकडे होत्या. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांना भेटून त्यांच्या कन्येच्या लग्नाचे निमंत्रण दिले, तर अंबादास दानवे शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर त्यांनी शरद पवारांची सदिच्छा भेट घेतली.

– रयत शिक्षण संस्थेच्या राजकारणात लक्ष

शरद पवारांनी कालच रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदाची पुन्हा सूत्रे स्वीकारली. या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फक्त त्यांचाच अर्ज दाखल झाल्याने त्यांची त्या पदावर बिनविरोध निवड झाली. त्यांनी रयत शिक्षण संस्थेला आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थांशी जोडून शिक्षणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणला पाहिजे, यावर भर दिला. ग्रामीण भागातली मुले आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोलत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आपण कुठे कमी पडतो. नवीन काय करायला पाहिजे, हे शोधून काम केले पाहिजे, असे ते म्हणाले.

पण, एकूणच गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांनी राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरच्या कुठल्याच राजकारणाविषयी भाष्य केले नाही. अगदी त्यांच्याच राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवंडे यांच्यावर शाईफेक झाली, तरी त्यावर शरद पवारांनी कुठली प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. फक्त सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी या मुद्द्यावर आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली. पण शरद पवार सगळ्याच राजकारणापासून अलिप्त राहिल्यासारखे वागले.

– अघोषित रिटायरमेंट

शरद पवारांनी त्यांच्या विस्तारित आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात रिटायरमेंटची घोषणा केली होती. तेव्हा ते राजकारणापासून बाजूला होऊन फक्त संस्थात्मक गोष्टींमध्ये लक्ष घालणार होते, पण त्यांना रिटायरमेंटची घोषणा प्रत्यक्षात अंमलात आणता आली नव्हती. त्यानंतर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडल्या. खुद्द त्यांची राष्ट्रवादी फुटली. त्यांना सत्तेबाहेर राहावे लागले. अजित पवार भाजपच्या सत्तेबरोबर निघून गेले. त्यानंतर जानेवारी महिन्यात अजित पवार यांची अकाली एक्झिट झाली. त्यानंतर सुद्धा राजकारणात बऱ्याच उलथापालथी झाल्या. स्वतः शरद पवार आजारी पडले. त्यानंतर आता बरे झाले. पण त्यांनी फक्त रयत शिक्षण संस्थेच्या संस्थात्मक राजकारणात लक्ष घालून राष्ट्रीय आणि राज्याच्या राजकारणापासून स्वतःला अलिप्त केले. त्यांनी रिटायरमेंटची घोषणा केली नाही. पण तशी घोषणा न करताच ते राजकारणातून रिटायर्ड झाल्यासारखे वागले.

Sharad Pawar “calm” even after INDI alliance split; Stays away from politics by participating in institutional affairs!!

 

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात